RCB vs SRH, Head to Head : बंगळुरु विरुद्ध हैदराबादमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
IPL : आयपीएलमध्ये आजवर रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ तब्बल 20 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत.
RCB vs SRH : आज आयपीएलमधील (IPL 2022) दुसऱ्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद (RCB vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार असणार आहेत. आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार होता. बंगळुरुने यंदा अप्रतिम कामगिरी करत तिसरं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघ देखील चांगली कामगिरी करत असल्याने त्यांच आव्हान बंगळुरुसाठी अडचणीचं ठरु शकतं. आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.
बंगळुरु विरुद्ध हैदराबाद Head to Head
आयपीएलमध्ये आजवर रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ तब्बल 20 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता हैदराबादचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरुने 8 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. पण यंदा बंगळुरुचा फॉर्म अधिक चांगला आहे. त्यामुळे दोघांती आजचा सामना चुरशीचा होऊ शकतो हे नक्की.
आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
बंगळुरु - अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, आकाश दीप, मोहम्मद सिराज
हैदराबाद - अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, जे सुचित, मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी. नटराजन
हे देखील वाचा-