(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR vs DC, Head to Head : कोलकाता विरुद्ध दिल्ली आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
IPL 2022 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या आजच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या एकमेंकाविरुद्धच्या कामगिरीवर एक नजर फिरवूया...
KKR vs DC : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (KKR vs DC) या आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या सामन्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात खेळवला जात आहे. दुपारच्या वेळेत होणारा हा सामना दवाची अडचण नसल्याने दोन्ही डावात चुरशीचा होणार अशी आशा क्रिकेट रसिकांना आहे. कोलकाता सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यांनी 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने 3 पैकी 2 सामने जिंकले असून एक सामना पराभूत झाले आहेत. दरम्यान आजच्या सामन्यापूर्वी या दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंका विरुद्धचा इतिहास पाहूया...
केकेआर तीन पैकी दोन सामने जिंकत पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे मुंबईचा संघ मात्र आठव्या स्थानी आहे. आजचा सामना मुंबईच्या एमसीए मैदानात पार पडणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघामधील कोणता संघ चांगली कामगिरी करेल यासाठी त्यांच्या आजवरच्या इतिहासावर (Head to Head) एक नजर फिरवू...
कोलकाता विरुद्ध दिल्ली Head to Head
आयपीएलमध्ये आजवर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ तब्बल 30 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी एकमेंकाना तगडं आव्हान दिलं आहे. कोलकात्याने या 30 पैकी 16 तर दिल्ली संघाने 30 पैकी 14 सामने जिंकले आहेत. दरम्यान यंदा कोलकात्याचा फॉर्म दमदार असला तरी आज सामना होणाऱ्या मैदानात दुपारच्या वेळेस झालेला एकमेव सामना दिल्लीने जिंकला आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की.
आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
कोलकाता - अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम, वरुण चक्रवर्ती.
दिल्ली - ऋषभ पंत (कर्णधार,विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रेहमान, ए. नॉर्खिया
हे देखील वाचा-
- Harshal Patel Sister Death : आरसीबीचा स्टार गोलंदाज हर्षल पटेलच्या कुटुंबावर शोककळा, मुंबईविरुद्ध सामना सुरु असताना बहिणीचे निधन
- RCB Vs MI: मुंबईचा सलग चौथा पराभव, बंगळुरूनं 7 विकेट्स राखून सामना जिंकला
- CSK vs SRH Top 10 Key Points : हैदराबादचा चेन्नईवर दमदार विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha