DC vs PBKS, Pitch Report : आज दिल्ली विरुद्ध पंजाबमध्ये सामना; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
आयपीएलमध्ये(IPL 2022) आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना पार पडणार असून दिल्लीने दोन तर पंजाबने तीन सामन्यात विजय मिळवला आहे.
DC vs PBKS, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स (DC vs PBKS) या दोन्ही संघात सामना पार पडणार असून दोघांची यंदाच्या हंगामातील कामगिरी बऱ्यापैकी समाना आहे. दिल्लीने 5 सामने खेळत दोन सामने जिंकून तीन गमावले आहेत. तर पंजाबने 6 सामने खेळत तीन सामने जिंकले असून तीन गमावले आहेत. आयपीएलमध्ये आजवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स तब्बल 28 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता पंजाबचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 13 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. दरम्यान आतापर्यंतच्या सामन्यांत खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...
दिल्ली विरुद्ध पंजाब अशी असेल ड्रीम 11 (DC vs PBKS Best Dream 11)
विकेटकीपर- ऋषभ पंत
फलंदाज- मयांक अगरवाल, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, शाहरुख खान
ऑलराउंडर- लियाम लिव्हिंगस्टोन, अक्षर पटेल,ओडियन स्मिथ
गोलंदाज- राहुल चाहर,कुलदीप यादव,शार्दुल ठाकूर.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना आधी पुण्यातील एमसीए मैदानात पार पडणार होता. पण दिल्ली संघात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने संघाचा लांबचा प्रवास टाळण्यासाठी सामने मुंबईत घेण्याचा निर्णय़ घेण्यात आला. त्यामुळे सामना आता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.
हे देखील वाचा-
- Virat Kohli Golden Duck: विराट कोहली चौथ्यांदा गोल्डन डकचा शिकार, चार वेळा शून्यावर गमावली विकेट
- Virat Kohli IPL Stats: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार विराट यंदा मात्र फ्लॉप, पाहा या मोसमात कोहलीची कामगिरी
- IPL 2022: अखेरच्या षटकात सामना फिरवणाऱ्या ओबेड मॅकॉयचं भरमैदानात पुष्पा सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ