Hardik Pandya : हार्दिक टी-20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेत दाखल, घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना नताशाची दोन शब्दांची पोस्ट चर्चेत...
Hardik Pandya Natasa Stankovic : टीम इंडियाचा उपकॅप्टनं हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा उपकॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. हार्दिक पांड्यानं किंवा नताशा स्टॅनकोविकनं घटस्फोटाबाबत थेट भाष्य केलेलं नाही. त्यामुळं वेगवेगवेळ्या चर्चांना उधाण आलं आहे. नताशा स्टॅनकोविकची आणखी एक इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. त्यामध्ये तिनं वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास करतानाचा व्हिडीओ पोस्ट करुन देवावर विश्वास ठेवा, असं म्हटलंय. नताशा स्टॅनकोविकनं काही दिवसांपूर्वी एक इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली होती, त्यात कुणीतरी लवकरच रस्त्यावर येणार असं म्हटलं होतं.
नताशा स्टॅनकोविकनं काही दिवसांपूर्वी जी स्टोरी पोस्ट केली होती त्यात कुणीतरी लवकरच रस्त्यावर येणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर देवावर विश्वास ठेवा अशा आशयाची पोस्ट नताशानं नेमकी का केली असा प्रश्न विचारला जातोय. नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्या एका जवळच्या मित्रानं ते दोघेही काही महिन्यांपासून वेगळं राहत असल्याचं म्हटल होतं. नताशानं हार्दिकचं घर देखील सोडल असल्याचा दावा देखील केला जातोय.
नताशाला करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना
आयपीएलचं पर्व अखेर संपलं आहे. मुंबई इंडियन्सची यंदाच्या पर्वातील कामगिरी खराब राहिली आहे. हार्दिक पांड्याला मुंबईनं विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी संघात आणून कॅप्टनपद दिलं होतं. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स समाधानकारक कामगिरी करु शकली नव्हती. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वप्रथम बाहेर पडली होती. मुंबई इंडियन्स सतराव्या आयपीएलमध्ये गुणतालिकेत दहाव्या स्थानावर राहिली आहे. मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्याच्या खराब कामगिरीमुळं नताशा स्टॅनकोविकला ट्रोलर्सनी ट्रोल केलं होतं.
दरम्यान, हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. भारतीय संघासोबत हार्दिक पांड्यानं सराव सुरु केला आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा एका सोशल मीडिया पोस्टनंतर सुरु झाली होती. नताशा स्टॅनकोविकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमधून पांड्या नाव हटवल्यानं या चर्चा वाढत गेल्या. नताशा स्टॅनकोविक काही दिवसांपूर्वी मुंबईत तिच्या एका मित्रासोबत माध्यमांसमोर आली होती. त्यावेळी तिला हार्दिक सोबतच्या घटस्फोटाबाबत विचारण्यात आलं होतं. नताशा स्टॅनकोविकनं त्यावेळी थँक्यू म्हणत अधिक भाष्य केलं नव्हतं.
संबंधित बातम्या :
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा