Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टी-20 विश्वचषक, पत्नी नताशासोबत घटस्फोटाची चर्चा; आता हार्दिक पांड्याने केली पोस्ट, काय म्हणाला?
Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: भारतीय संघ 25 मे रोजी विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना झाला. यावेळी हार्दिक पांड्या संघासोबत दिसला नाही.
![Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टी-20 विश्वचषक, पत्नी नताशासोबत घटस्फोटाची चर्चा; आता हार्दिक पांड्याने केली पोस्ट, काय म्हणाला? Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: Hardik Pandya has shared a post on social media while discussing divorce with his wife Natasha. Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टी-20 विश्वचषक, पत्नी नताशासोबत घटस्फोटाची चर्चा; आता हार्दिक पांड्याने केली पोस्ट, काय म्हणाला?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/29/7db810091effe3e85ef6d8abc8d31dd91716954893429987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: गेल्या काही दिवसांपासून मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार आणि भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) यांच्या घटस्फोटबाबत चर्चा रंगली आहे. याचदरम्यान हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
हार्दिक आणि नताशा गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे राहत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. याचदरम्यान 2 जूनपासून आयसीसी विश्वचषकाची स्पर्धा सुरु होत आहे. भारतीय क्रिकेट संघाने अमेरिकेला जाऊन सराव देखील सुरु केला आहे. या सरावात आता हार्दिक पांड्याही सहभागी झाला आहे. भारतीय संघ 25 मे रोजी विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना झाला. यावेळी हार्दिक पांड्या संघासोबत दिसला नाही. त्यामुळे आयपीएलनंतर हार्दिक पांड्या नेमका कुठे आहे?, याबाबत सवाल उपस्थित केले जात होता. मात्र आज हार्दिक पांड्याने पोस्ट करुन 'नॅशनल ड्युटी ऑन', असं म्हटलं आहे आणि सरावातील काही फोटो देखील शेअर केले आहेत.
On national duty 🇮🇳 pic.twitter.com/pDji7UkUSm
— hardik pandya (@hardikpandya7) May 29, 2024
हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा भाग-
हार्दिक पांड्या हा 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. यानंतर त्याचा पहिला सामना 5 जूनला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी सामना होणार आहे.
घटस्फोटाच्या चर्चांवर पांड्या-नताशाचं मौन -
महत्त्वाची बाब म्हणजे पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र अद्याप दोघांकडूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यासोबतच पांड्याचा भाऊ क्रुणालही काही बोलला नाही. अलीकडेच नताशाला घटस्फोटाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तिने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले आणि निघून गेली.
नेमकं प्रकरण काय?
हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वी नताशा तिचे नाव नताशा स्टॅनकोविक पांड्या असे ठेवायची, पण आता तिने तिचे नाव पूर्णपणे काढून टाकले आहे. 4 मार्च रोजी नताशाचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या दिवशी देखील हार्दिक पांड्याने कोणतीही पोस्ट देखील केली नाही. नताशाने तिच्या आणि हार्दिकच्या अलीकडील सर्व पोस्ट डिलीट केल्या. याशिवाय नताशा यावेळी आयपीएल मॅच पाहायलाही आली नाही. तसेच नताशाने मुंबई इंडियन्सच्या समर्थनार्थ काहीही पोस्ट केली नाही.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)