एक्स्प्लोर

IPL 2023 : फिनिशिंगला गुजरातचा नाद खुळा... पंजाबचाही अखेरच्या षटकात केला पराभव

IPL 2023 : आयपीएलमध्ये गुजरात संघाला चेज मास्टर म्हटल्यास वावगे वाटायला नको... कारण गुजरात संघ लक्षाचा पाठलाग करताना 90  टक्के यशस्वी ठरतोय.

IPL 2023 : आयपीएलमध्ये गुजरात संघाला चेज मास्टर म्हटल्यास वावगे वाटायला नको... कारण गुजरात संघ लक्षाचा पाठलाग करताना 90  टक्के यशस्वी ठरतोय. 2022 पासून गुजरातची विजयी घौडदोड आजही सुरुच  आहे. गुजरातने लक्षाचा पाठलाग करताना 12 पैकी 11 वेळा विजय मिळवला आहे. फक्त मुंबईविरोधात गुजरातला लक्षाचा पाठलाग  करताना अपयश आले आहे. गुजरातने चेन्नईविरोधोधात सर्वाधिक तीन वेळा यशस्वी लक्षाचा पाठलाग केलाय. लखनौ, पंजाब, हैदराबाद, आरसीबी, राजस्थान, पंजाब आणि दिल्ली या संघाविरोधात गुजरातने यशश्वी लक्षाचा पाठलाग केलाय. 

2022 च्या हंगमात गुजरात संघ चषक जिंकेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने हा करिश्मा करुन दाखवला आहे. गुजरातचा संघ चॅम्पियन होण्याचे कारण चेस मास्टर होय... कारण, गुजरातचा संघ अतिशय पद्धशीरपणे धावांचा पाठलाग करतो... प्रत्येक फलंदाज आपले काम चोख बजावतो... एकापेक्षा एक सरस फलंदाज गुजरातकडे आहेत. डेविड मिलर, राहुल तेवातिया आणि राशिद खान या तिघांनी गुजरातला जेच मास्टर करण्यात मोठा वाटा उचलला आहे. धावांचा पाठलाग करताना डेविड मिलर, राहुल तेवातिया अथवा राशिद खान यांच्यापैकी एखादा फलंदाज मैदानावर असतोच. आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे.. धावांचा पाठलाग करताना गुजरातने नऊ सामन्यात अखेरच्या षटकात बाजी मारली आहे. आजही पंजाबविरोधात अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली.

गेल्या हंगमात गुजरातने नऊ वेळा धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. यामध्ये त्यांनी आठ सामन्यात विजय मिळवला होता. यंदाच्या हंगमातील तीन सामन्यात गुजरातने यशस्वी धावांचा पाठलाग केला आहे. गुजरातला फक्त मुंबईविरोधात धावांचा पाठलाग करण्यात अपयश आलेय. आयपीएल 2022 मधील 51 व्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना सहा विकेटच्या मोबदल्यात 176 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर गुजरातचा संघाला पाच धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता. या सामन्याचा अपवाद वगळता गुजरातने आतापर्यंत आयपीएलमध्ये यशस्वी रन चेज केले  आहेत.  आजही गुजरातने धावांचा पाठलाग करत पंजाबचा पराभव केला. पंजाबविरोधात अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली. डेविड मिलर आणि राहुल तेवातिया यांनी गुजरातला विजय मिळवून दिला. 
 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 5 PM : 25 January 2025Maha Kumbha 2025 | Aghori Sadhu | कसे बनतात अघोरी साधू? काय असते दिनचर्या?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 25 January 2025Dhananjay Deshmukh On Balaji Tandale CCTV : सरपंच हत्येतील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवले? खरेदीचा CCTV समोर, देशमुखांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Embed widget