पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
Meri Maati Mera Desh Campaign: दीड वर्षांचा कालावधी आता लोटत असतानाही राज्यातील पंचायत विभागानं या कामावर केलेला खर्च ग्रामपंचायतीला दिला नसल्यानं त्यांना या उपक्रमाचा विसर पडल्याचं दिसून येत आहे.

Meri Maati Mera Desh : आझादी का अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून 2023 मध्ये राज्यातील 27 हजार 951 ग्रामपंचायतमध्ये पंतप्रधान मोदींच्या मराठी भाषांतर संदेशाचे शिलाफलक ग्रामपंचायतींनी गावोगावी लावलेत. या शिलाफलकावर अमृत महोत्सवाचा लोगो, शहीद वीरांची नावं आणि पंचप्राण शपथ मराठीत लिहिण्याचं शासकीय पत्र निर्गमित करण्यात आलं होतं. यासाठी मनेरेगाच्या निधीतून खर्च करण्याचे आदेश मनरेगा आयुक्तांचा होता. या कामावर केलेल्या खर्चाचा निधी मिळावा यासाठी ग्रामपंचायतकडून पंचायत विभागाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आलेत. मात्र, दीड वर्षांचा कालावधी आता लोटत असतानाही राज्यातील पंचायत विभागानं या कामावर केलेला खर्च ग्रामपंचायतीला दिला नसल्यानं त्यांना या उपक्रमाचा विसर पडल्याचं दिसून येत आहे.
राज्यभरातील ग्रामपंचायतची कोट्यवधींची रक्कम थकीत
मात्र, अद्यापही निधी नं मिळाल्यानं राज्यातील हजारो ग्रामपंचायती या निधीची वाट पाहत आहेत. नागपूर विभागातील 3 हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा 9 कोटी 32 लाखांपेक्षा अधिक निधी थांबला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निधी अद्याप मिळालेला नसल्यानं ही रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. सरपंच संघटनेनं हा निधी तातडीनं मिळावा, यासाठी वारंवार पंचायत विभागाकडं पत्रव्यवहार केला आहे. मागील दीड वर्षापासून विसर पडलेल्या पंचायत विभागानं पुन्हा आता एकदा ग्रामपंचायतीकडून नव्यानं शिलाफलकावर करण्यात आलेल्या खर्चाचा नव्यानं प्रस्ताव मागितला आहे.
नागपूर विभागातील ग्रामपंचायती
भंडारा - ५४१
नागपूर - ५३२
चंद्रपूर - ८२५
गडचिरोली - ४४५
गोंदिया - ५४३
वर्धा - ५२२
वाहन धारकांवर तब्बल 51 कोटींची थकबाकी
अमरावती जिल्ह्यात वाहनाचे नियम मोडणाऱ्या विरुद्ध वाहतूक पोलीस ई-चालान देत दंड करते. ती दंडाची रक्कम वाहन धारकांना भरावीच लागते. मात्र अमरावती जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण मिळून मागील पाच वर्षात तब्बल 8 लाख 9 हजार 376 वाहन धारकांनी दहा-वीस नव्हे तर तब्बल 51 कोटी 75 लाख 16 हजार 750 रुपये ई-चालान दंडाची रक्कम भरली नाहीये. त्यामुळे आता अमरावती पोलिसांनी विशेष मोहीम राबविली असून प्रत्येक वाहन धारकांच्या घरी जाऊन त्यांना नोटीस बजावल्या जात आहे.
जर ही नोटीस भेटल्यावर ही दंडाची रक्कम भरली नाहीतर वाहन जप्त केल्या जाईल किंवा थेट न्यायालयात खटला दाखल केला जाईल. मग मात्र तुम्हाला दंडाची रक्कम आणि त्यावर दंड सुद्धा होऊ शकते. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला अमरावतीकर वाहन धारक प्रतिसाद देतील अशी आशा करू या. ई चालानची रक्कम भरलेली पुरेल मात्र न्यायालयाची पायरी न चढलेली बरी त्यामुळे वाहन धारकांनी लवकरात लवकर कोणत्याही वाहतूक शाखेच्या कर्मचारी, पोलीस स्टेशन किंवा ऑनलाईन ई चालान दंडाची रक्कम जमा करावी असं आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी एबीपी माझाशी बोलताना केलंय
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
