(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जोस बटलर नॉटआऊट 700+, विराट-वॉर्नर यांच्या यादीत मिळवले स्थान
Gujarat Titans vs Rajasthan Royals : पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात आणि राजस्थान यांच्यात सामना सुरु आहे.
Gujarat Titans vs Rajasthan Royals : पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात आणि राजस्थान यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात विस्फोटक फलंदाज जोस बटलरच्या खेळीच्या बळावर राजस्थानने 188 धावांपर्यंत मजल मारली. मागील तीन सामन्यात फ्लॉप ठरणाऱ्या बटलरने क्वालिफायर सामन्यात धावांचा पाऊस पाडला. बटलरने 56 चेंडूत 89 धावांची खेळी केली.. बटलरने आयपीएलच्या 15 व्या हंगामात सातशे धावांचा टप्पा पार केलाय... यासह बटलरने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
बटलरचा विक्रम -
गुजरातविरोधात जोस बटलर पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतलाय. बटलरने 56 चेंडूत 89 धावांची खेळी केली.. या खेळीसह बटलरने आयपीएलच्या 15 व्या हंगामात सातशे धावांचा टप्पा पार केलाय. एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सातव्या क्रमांकावर पोहचलाय. या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.. कोहलीने एका हंगामात 973 धावा चोपल्या होत्या.. बटलरने या यादीत स्थान मिळवलेय.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज -
विराट कोहली - 973
डेविड वॉर्नर - 848
केन विल्यमसन - 735
ख्रिस गेल - 733
माइक हसी - 733
जोस बटलर - 718
बटलरची अर्धशतकी खेळी -
यंदाच्या हंगामात तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या जोस बटलरने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.. गुजरातच्या भेदक माऱ्यापुढे बटलरची बॅट शांत होती. बटलरने 42 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. जोस बटलर 31 चेंडूत 30 धावांवर खेळत होता.. त्यानंतर अखेरच्या षटकात बटलरने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. बटलरने अर्धशतक करेपर्यंत एकही षटकार लगावला नाही... अखेरच्या तीन षटकांमध्ये जोस बटलरने धावांचा पाऊस पाडला.. चौकार आणि षटकारांनी खोऱ्याने धावा वसूल केल्या... जोस बटलरला गुजरातच्या खेळाडूंनी जिवदान दिले..त्याचा फायदा बटलरने उचलला.. जोस बटलरने 56 चेंडूत 89 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान बटलरने 12 चौकार आणि दोन षटकार लगावले.
हे देखील वाचा-
- WT20 Challenge 2022: शेफाली वर्मा, लॉरा वोल्वार्डची वादळी खेळी; व्हेलोसिटीचा सुपरनोव्हासवर सात विकेट्सनं विजय
- AB de Villiers: टायगर अभी जिंदा है! पुढच्या हंगामात एबी डिव्हिलियर्सची आरसीबीच्या संघात होणार एन्ट्री
- IPL 2022: आयपीएलमधील खास विक्रमापासून युजवेंद्र चहल फक्त एक विकेट दूर, आजच्या सामन्यात रचणार इतिहास?