Mumbai Indians : हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात का गेला? गुजरातच्या डायरेक्टरने सांगितले उत्तर
Mumbai Indians : हार्दिक पंड्याला आपल्या संघात घेण्यास मुंबई इंडियन्सला यश आलंय. हार्दिकने गुजरात टायन्सला पदार्पणाच्या हंगामातच आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं होतं.
![Mumbai Indians : हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात का गेला? गुजरातच्या डायरेक्टरने सांगितले उत्तर gujarat titans director of cricket on hardik pandya return in mumbai indians ipl 2024 latest sports news Mumbai Indians : हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात का गेला? गुजरातच्या डायरेक्टरने सांगितले उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/10/83100fbc97dde8c9c6c80fc308c600c5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hardik Pandya In Mumbai Indians : भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला आपल्या संघात घेण्यास मुंबई इंडियन्सला यश आलंय. हार्दिकने गुजरात टायन्सला पदार्पणाच्या हंगामातच आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं होतं. तर गेल्या हंगामात गुजरात टायटन्सने अंतिम सामन्यात धडक मारली होती. आता हार्दिक पंड्या मुंबईच्या संघात परताच गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार मिळालाय. गुजरातने धडाकेबाज फलंदाज शुभमन गिलवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. हार्दिक पांड्या 2015 पासून मुंबईच्या ताफ्यात होता. त्यानंतर 2022 मध्ये तो गुजरात संघाचा कर्णधार झाला. त्यानंतर आता पुन्हा तो मुंबईच्या ताफ्यात सामील झालाय.
हार्दिक पांड्याने गुजरातची साथ का सोडली ?
हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचं कर्णधारपद सोडून मुंबईची वाट का धरली? याची जोरदार चर्चा सुरु आहे. याचे उत्तर गुजरात टायटन्सच्या डायरेक्टर ऑफ क्रिकेट विक्रम सोळंकी यांनी दिलेय. ते म्हणाले की," हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्याच्या निर्णायचा आम्ही सन्मान केला. " हार्दिक पांड्या मुंबईच्या संघाचा पुन्हा एकदा सदस्य झालाय. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने शानदार कामगिरी केली होती.
हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातची धमाकेदार कामगिरी -
आयपीएल 2022 मध्ये गुजरातचा संघ पहिल्यांदाच उतरला होता. पहिल्याच हंगामात हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात संघाने जेतेपद उंचावले होते. त्यानंतर 2023 च्या हंगमात गुजरातला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. फायनल सामन्याच चेन्नईकडून गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेरच्या चेंडूवर चेन्नईने थरारक विजय मिळवला होता.
हार्दिक मुंबईच्या ताफ्यात -
IPL मधली सर्वात मोठी घडामोड म्हणून ज्याकडे पाहिलं जात होतं, त्या करारावर अखेर रविवारी रात्री शिक्कामोर्तब झालं. यानुसार गुजरात टायटन्सला आयपीएलचं जेतेपद मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पंड्या आता स्वगृही अर्थात मुंबई संघात डेरेदाखल होणार आहे. रविवारी संध्याकाळी यासंदर्भात काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. आधी हार्दिकला गुजरातनं आपल्याकडेच ठेवल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं. मात्र, आता हार्दिक मुंबईकडे परतणार असल्याच्या व्यवहारावर शिक्कामोर्तब झालं आहे.19 डिसेंबरला दुबई येथे खेळाडू लिलावप्रक्रिया पार पडणार असून त्यापूर्वी 12 डिसेंबरपर्यंत संघांना खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुभा आहे. आता हार्दिक मुंबई संघात परतण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आयपीएलमध्ये हार्दिकचे धमाकेदार करियर -
हार्दिक पांड्याचे आयपीएलमध्ये शानदार करियर राहिलेय. हार्दिक पांड्याने आतापर्यंत 123 सामने खेळले आहेत. मुंबई आणि गुजरात संघासाठी हार्दिक पांड्या आयपीएलच्या मैदानात उतरला. हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये 145.86 च्या स्ट्राईक रेटने आणि 30.38 च्या स्ट्राईक रेटने 23.09 धावा काढल्या आहेत. गोलंदाजीतही 53 विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)