Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: गुजरातने मैदान मारलं, हैदराबादला 7 विकेट्सने नमवलं; मोहित शर्मा, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर चमकले
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: हैदराबादने गुजरातला 163 धावांचं आव्हान दिलं होतं.
![Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: गुजरातने मैदान मारलं, हैदराबादला 7 विकेट्सने नमवलं; मोहित शर्मा, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर चमकले GT vs SRH Score Live IPL 2024: Gujarat Titans defeated Sunrisers Hyderabad by 7 wickets. Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: गुजरातने मैदान मारलं, हैदराबादला 7 विकेट्सने नमवलं; मोहित शर्मा, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर चमकले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/31/0e3bb698f4c8ecd3ac5fcc2616a025a11711892068694987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
GT vs SRH Score Live IPL 2024: आयपीएल 2024 च्या हंगामात आज गुजरात (GT) अन् हैदराबाद (SRH) यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली आहे. हैदराबादने गुजरातला 163 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना गुजरातने 7 विकेट्स राखत हैदराबादचा पराभव केला.
Match 12. Gujarat Titans Won by 7 Wicket(s) https://t.co/hdUWPFsHP8 #TATAIPL #IPL2024 #GTvSRH
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2024
गुजरातकडून डेव्हिड मिलरने 44 धावांची शानदार खेळी केली. 27 चेंडूंचा सामना करताना त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. मिलर नाबाद राहिला. साई सुदर्शनने 45 धावांची खेळी केली. 36 चेंडूंचा सामना करताना त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. संघाला पहिला धक्का 5व्या षटकात ऋद्धिमन साहाच्या रूपाने बसला, ज्याने 13 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. तर कर्णधार शुभमन गिलने 28 चेंडूत 36 धावा केल्या. विजय शंकर 14 धावा करून नाबाद राहिला. गुजरातकडून मोहित शर्माने गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. त्याने 3 बळी घेतले. उमेश यादव, राशिद खान, उमरझाई आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट्स मिळाली.
नाणेफेक जिंकून हैदराबाद सनरायझर्सने फलंदाजीचा निर्णय-
नाणेफेक जिंकून हैदराबाद सनरायझर्सने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेनला चांगली कामगिरी करता आली नाही. अब्दुल समद आणि शाहबाज अहमद यांनी सहाव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी करून संघाला सावरले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबादने पहिल्या 4 षटकांत चांगली सुरुवात केली होती, परंतु पहिली विकेट पडल्यानंतर अचानक हैदराबादने 15 व्या षटकात केवळ 114 धावांवर 5 विकेट गमावल्या. त्यानंतर समद आणि शाहबाज यांनी सहाव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. मात्र, हैदराबाद 170 धावा ओलांडणार असे वाटत असतानाच अखेरच्या षटकांत सामना पुन्हा फिरला. मोहित शर्माने शेवटच्या षटकांत केवळ तीन धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यामध्ये एक खेळाडू धावबाद झाला. हैदराबादकडून शाहबाज अहमद, मयंक मार्कंडे आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 1 बळी घेतले. यादरम्यान शाहबाजने 2 षटकांत 20 धावा, मयंकने 3 षटकांत 33 धावा आणि कमिन्सने 4 षटकांत 28 धावा दिल्या.
संबंधित बातम्या:
मयंक यादवच्या गोलंदाजीवर प्रशिक्षक खूश; पाकिस्तानच्या संघालाही याआधी दिली आहे ट्रेनिंग
...तेव्हा मिचेल स्टार्क आयपीएलमधील धोकादायक गोलंदाज ठरेल; इरफान पठाणने सांगितलं समीकरण!
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)