Dwayne Bravo IPL 2025 : IPLपुर्वी आणखी एक उलटफेर; केकेआरची मोठी खेळी, गंभीरच्या जागी धोनीच्या लाडक्या बनवले मेंटॉर
गौतम गंभीरच्या जागी ड्वेन ब्राव्होची KKR मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे.
Dwayne Bravo joins KKR as mentor for IPL 2025 : आयपीएल 2025 चा हंगाम अजून दूर आहे, परंतु संघांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून लवकरच रिटेनशन पॉलिसी जारी करण्यात येणार असल्याची बातमी आहे. परंतु संघांनी त्यांच्या सपोर्ट स्टाफला आणखी मजबूत करण्यासाठी कामाला सुरूवात केली आहे. आता केकेआर आणि सीएसकेबद्दल बातम्या येत आहेत. केकेआरने आपल्या नवीन मार्गदर्शकाची घोषणा केली आहे. सीएसकेसाठी हा थोडासा धक्का असू शकतो.
ड्वेन ब्राव्हो बनला केकेआरचा नवा मार्गदर्शक
आयपीएलचा सध्याचा चॅम्पियन संघ केकेआर म्हणजेच कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या नवीन मार्गदर्शकाची घोषणा केली आहे. केकेआरने म्हटले आहे की, वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक ड्वेन ब्राव्हो आता त्यांचा नवा मार्गदर्शक असेल. यापूर्वी ड्वेन ब्राव्हो सीएसके संघात होता. तो सीएसके संघाकडूनही खेळला आहे. गेल्या काही हंगामांपासून तो गोलंदाजी सल्लागाराची भूमिका बजावत होता. आयपीएलच्या इतिहासात ड्वेन ब्राव्हो हा मुंबई आणि सीएसके या दोन्ही संघांसाठी खेळलेला आहे. सीएसकेसाठी आयपीएल जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. 2011 पासून तो सतत चेन्नई सुपर किंग्जसोबत दिसत होता, पण आता त्याच्या जर्सीचा रंग बदलणार आहे.
Say hello to our new Mentor, DJ 'sir champion' Bravo! 💜
— KolkataKnightRiders (@KKRiders) September 27, 2024
Welcome to the City of Champions! 🎶🏆 pic.twitter.com/Kq03t4J4ia
खरंतर आधी गौतम गंभीर केकेआरच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावत होता, परंतु आता तो भारती संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. तो गेल्यापासून कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलमध्ये चांगला अनुभव असलेल्या अनुभवी खेळाडूच्या शोधात होता. आता हा शोध ड्वेन ब्राव्होने संपवला आहे. ड्वेन ब्राव्होचे केकेआरमध्ये जाणे कोलकाता नाईट रायडर्ससाठी फायदेशीर ठरू शकते, तर ते सीएसकेसाठी नुकसान होऊ शकते. आता ड्वेन ब्राव्होच्या जागी चेन्नई सुपर किंग्ज कोणाला स्थान देणार हे पाहायचे आहे.
ड्वेन ब्राव्होची टी-20 क्रिकेट कारकीर्द
ड्वेन ब्राव्हो जवळपास 21 वर्षे क्रिकेट खेळला. या काळात ड्वेन ब्राव्होने त्याच्या टी-20 कारकिर्दीत एकूण 582 सामने खेळले. या सामन्यांमध्ये ब्राव्होने 631 विकेट घेतल्या आणि 6970 धावा केल्या. तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. ड्वेन ब्राव्होने 11 वेळा एका डावात 4 विकेट आणि टी-20 क्रिकेटमध्ये दोन वेळा 5 विकेट घेतल्या आहेत. आता तो कोलकाता नाईट रायडर्सच्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंसोबत आपला अनुभव शेअर करणार आहे.
हे ही वाचा -