Shoaib Malik : सानियासोबत काडीमोड, तिसरं लग्न केलं तरी शोएब मलिक सुधरेना, आता अभिनेत्रीला करतोय Flirty Messages
Shoaib Malik : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबत शोएब मलिक यानं घटस्फोट घेऊन तिसऱ्यांदा संसार थाटला. पण एब मलिक पुन्हा एकदा अफेयरमुळे चर्चेत आहे.
Nawal Saeed On Flirty Messages: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबत शोएब मलिक यानं गेल्या काही दिवसांपूर्वी घटस्फोट (Sania Mirza's Divorce From Shoaib Malik) घेतला होता. शोएब मलिक यानं पाकिस्तान अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लगिनगाठ बांधली. शोएब मलिक याचं हे तिसरं लग्न होय. पण तरीही शोएब मलिक सुधारला नसल्याचं दिसतेय.कारण, पाकिस्तानी अभिनेत्री नवल सईद हिच्या वक्तव्यानंतर शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आहे. नवल सईद हिने एका टिव्ही शो मध्ये सनसनाटी खुलासा केलाय. तिनं थेट नाव घेतलं नाही, पण शोएब मलिकबद्दल विचारल्यावर काही प्रतिक्रियाही दिली नाही, त्यामुळे शोएब मलिक पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. पाकिस्तानी टिव्ही शोवर नवल सईद हिला पाकिस्तानी खेळाडू फ्लर्टी मेसेज करतात की नाही? असा प्रश्न विचारला होता. त्यावर नवल सईदने दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
क्रिकेटर्स फ्लर्टी मेसेज करतात, नेमकं काय म्हणालाी नवल सईद -
फ्लर्टी मेसेज कोण कोण करतात ? या प्रश्नाचं उत्तर देताना नवल सईद हिनं चकीत करणारं उत्तर दिलेय. नवल सईद म्हणाली की, अभिनेते मेसेज करत नाहीत, पण खेळाडू मला फ्लर्टी मेसेज करतात. नवल सईदला खेळाडूचं नाव विचारलं.. त्यावर नवल सईद हिने कोणत्याही खेळाडूचं नाव घेण्यास नकार दिला. पण नवल सईद हिनं दिलेली हिंट सध्या चर्चेत आहे. सतत मेसेज करणाऱ्या खेळाडूनं जर भानात राहायला हवं, असेही नवल हिनं या शोमध्ये सांगितलं. इतकेच नाही तर फ्लर्टी मेसेज करणारा खेळाडू सिंगल नाही, असेही ती म्हणाली.
View this post on Instagram
नवल सईदला शोएब मलिक फ्लर्टी मेसेज करतो?
नवल सईद हिला होस्टने तात्काळ शोएब मलिक याचेच नाव घेऊन विचारलं. त्यावर नवल सईद हिने फक्त स्मितहास्य करत उत्तर देणं टाळलं. म्हणजेच, होस्टने ज्यावेळी शोएब मलिक याचं नाव घेतलं, त्यावर नवल सईद हिने हो अथवा नाही.. असं कोणतेही उत्तर दिलं नाही. त्यामुळे शोएब मलिक तिसऱ्या लग्नानंतरही अभिनेत्री नवल सईद हिला फ्लर्टी मेसेज करतो.. आशा सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत. सोशल मीडियावर शोएब मलिक याला जोरदार ट्रोल केले जात आहे. दरम्यान, शोएब मलिक यानं स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासोबत काडीमोड घेतला. त्यानंतर तो तिसऱ्यांदा बाहुल्यावर चढला. शोएब मलिक यानं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत संसार थाटला आहे. पण तरीही तो अद्याप सुधारला नसल्याच्या चर्चा सुरु आहे. पाकिस्तान अभिनेत्री नवल सईद हिच्या टिव्ही कार्यक्रमातील वक्तव्यानंतर शोएब मलिक याच्यावर सडकून टीका होत आहे. नेटकऱ्यांकडून त्याला ट्रोल करण्यात येते. सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे.
View this post on Instagram