(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MI-W vs DC-W : मुंबईची विजयाची हॅट्ट्रीक, दिल्लीला आठ विकेट्सनं हरवले
DC-W vs MI-W WPL 2023 : या विजयासह मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचला आहे.
DC-W vs MI-W WPL 2023 Match Highlights : महिला आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने विजयाची हॅट्ट्रीक केली. आज झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा आठ विकेट्सने पराभव केला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 106 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युतरात मुंबईने दोव विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केले. मुंबईने गोलंदाजी आणि फलंदाजीत पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली. मुंबईकडून फिरकी गोलंदाज सायका इशाक आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या तर यास्तिका भाटियाने हिने 41 धावांचे योगदान दिलेय. या विजयासह मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचला आहे.
3️⃣/3️⃣ 💪
— Mumbai Indians (@mipaltan) March 9, 2023
A 𝐌𝐈ghty Performance 🔥#OneFamily #MumbaiIndians #AaliRe #DCvMI pic.twitter.com/HdeF6nQBqb
दिल्लीचा फ्लॉप शो -
मुंबईच्या गोलंदाजीसमोर दिल्लीची फलंदाजी ढासळली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीचा संघ 18 षटकात 108 धावांत संपुष्टात आला. दिल्लीची कर्णधार लेनिंगने सर्वाधिक 43 धावांचे योगदान दिले. लेनिंगचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. मुंबईने पॉवप्लेमध्येच टिच्चून मारा करत दिल्लीला थोपवले. शेफाली वर्मा 2, अॅलिस कॅप्सी सहा केप, 2 जेमिमा 25, जोनासन 2, तानिया भाटिया 4 यांना मोठी खेळी करता आली नाही. राधा यादव हिने दहा धावांची खेळी केली. मुंबईसाठी या सामन्यात गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. सायका इशाक, इस्सी वाँग आणि हीली मॅथ्यूज यांवी प्रत्येकी तीन तीन विकेट्स घेतल्या.
मुंबईची दमदार फलंदाजी -
दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग मुंबई 15 व्या षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात केला. मुंबई इंडियन्सचे सलामीवीर फलंदाज यस्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज यांनी विस्फोटक सुरूवात केली. या दोघांनी मुंबईला सहा षटकात 47 धावांपर्यंत पोहचवले. यस्तिका भाटियाने आक्रमक फटकेबाजी करत 32 चेंडूत 41 धावा केल्या. तर हेली मॅथ्यूने 31 चेंडूत 32 धावांचं योगदान दिले. त्यानंतर नॅट सिवर ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. दोघिंनी 15 व्या षटकात मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईचा हा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय होय.
Saika Ishaque is our Player of the Match and a proud purple 💜 Cap holder #OneFamily #MumbaiIndians #AaliRe #DCvMI
— Mumbai Indians (@mipaltan) March 9, 2023
Saika Ishaque, bought by Mumbai Indians for just 10 Lakh, who is yet to play for India:
— Johns. (@CricCrazyJohns) March 9, 2023
3.1-1-11-4
4-0-26-2
3-0-13-3
Some of the wickets are Lanning, Jemi, Shafali, Sophie Devine & holds the purple cap in WPL. pic.twitter.com/Vt5h7pADfU