DC vs RCB IPL 2025 : कृणाल पांड्या अन् विराट कोहलीने ठोकले अर्धशतक, आरसीबीचा सातवा विजय! दिल्लीचा गड जिंकला
DC vs RCB Live Score IPL 2025 : आयपीएल 2025 चा प्रवास पुन्हा एकदा देशाची राजधानी नवी दिल्लीत पोहोचला आहे.

Background
Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore Live Updates : आयपीएल 2025 चा प्रवास पुन्हा एकदा देशाची राजधानी नवी दिल्लीत पोहोचला आहे. लीगच्या 46 व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येणार आहेत. अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती कारण दोन्ही संघांमधील शेवटचा सामना बंगळुरूमध्ये झाला होता. त्यानंतर केएल राहुलने दिल्लीला त्याच्या घरच्या मैदानावर शानदार विजय मिळवून दिला होता. अशा परिस्थितीत, यावेळी सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर आहेत की तो त्याच्या होमग्राउंड दिल्लीत बंगळुरूला विजय मिळवून देऊ शकेल की नाही.
कृणाल पांड्या अन् विराट कोहलीने ठोकले अर्धशतक, आरसीबीचा सातवा विजय!
आयपीएल 2025 च्या 46 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव केला. आरसीबीच्या विजयाचे हिरो विराट कोहली आणि कृणाल पंड्या होते. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. विराटने 51 धावा आणि कृणालने 73 धावा केल्या. या विजयासह, आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
आरसीबीला चौथा धक्का, 51 धावा करून विराट कोहली OUT
आरसीबीला विराट कोहलीच्या रूपाने चौथा धक्का बसला. तो 51 धावा करून बाद झाला. टिम डेव्हिड आता क्रीजवर आहे.



















