एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DC vs LSG, Top 10 Key Points : लखनौचा दिल्लीवर अवघ्या 6 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
DC vs LSG, Highlights, IPL 2022 : लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC) सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत चुरस दिसून आली. पण सामना अखेर लखनौने जिंकली.
DC vs LSG, IPL 2022 : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अखेर पर्यंत झुंज देऊनही लखनौ सुपरजायंट्सचा (MI vs LSG) 6 धावांनी विजय मिळवला आहे. सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला होता, पण अखेर दिल्लीचा पराभव झाला. ज्यामुळे गुणतालिकेत दिल्लीचा संघ थेट सहाव्या स्थानावर पोहोचला असून लखनौ मात्र थेट दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. सामन्यात लखनौने प्रथम गोलंदाजी करत 195 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीसमोर 196 धावांचे आव्हान होते. हे आव्हान पार करताना 20 षटकात दिल्ली सात विकेट गमावत 189 धावाच करु शकल्याने सहा धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
DC vs LSG 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे. आजही लखनौने नाणेफेक जिंकली, विशेष म्हणजे लखनौने प्रथम फलंदाजीसारखा निर्णय घेऊनही त्यांचाच विजय झाला आहे.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आजही केएल राहुल चमकला. राहुलने 51 चेंडूत 77 धावांची दमदार खेळी केली. त्याला दीपक हुडाने 52 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली.
- राहुल-दीपक बाद झाल्यानंतर अखेर मार्कस स्टॉयनिस (नाबाद 17) आणि कृणालने (नाबाद 9) धावा करत संघाचा स्कोर 195 धावांपर्यंत नेला.
- दिल्लीकडून एकाही गोलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. अक्षरने चांगली गोलंदाजी केली पण तो विकेट घेऊ शकला नाही. तर तीन विकेट्स घेणारा शार्दूल मात्र 40 धावा देऊन गेला.
- 196 धावांचे एक मोठे आव्हान दिल्लीसमोर असल्याने त्यांच्यावर आधीच दबाव होता. त्यामुळे त्यांची सुरुवात खराब झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर 13 धावांवर बाद झाले.
- त्यानंतर मिचेल मार्श आणि ऋषभ पंतने एक मोठी भागिदारी रचली. जी संघासाठी महत्त्वाची ठरत होती. पण तेव्हाच मार्श 37 धावांवर बाद झाला.
- कर्णधार पंत एकहाती झुंज देत होता, ज्यामुळे दिल्ली जिंकेल असे वाटत होते. पण पंतही 44 धावा करुन तंबूत परतला. ज्यामुळे संघाची अडचण वाढली.
- अखेर अष्टैपूल रोवमेन पोवेलने धडाकेबाज कामगिरी सुरु केली. पण 35 धावा करुन तो बाद झाला आणि दिल्लीचा विजय फारच अवघड झाला.
- सामन्यात दिल्लीचं आव्हान संपत आहे असं वाटताना अक्षर आणि कुलदीपने एक उत्तम झुंज दिली. दोघांनी काही षटकारही खेचले ज्यामुळे अखेरच्या षटकापर्यंत खेळ गेला.
- अखेरच्या षटकात स्टॉयनिसने मात्र 21 धावा डिफेन्ड केल्या, ज्यामुळे लखनौचा संघ सहा धावांनी जिंकला.
हे देखील वाचा-
- DC vs LSG, Match Highlights: चुरशीच्या सामन्यात अखेर दिल्ली पराभूत; लखनौ विजयासह पुढील फेरीच्या उंबरठ्यावर
- Rohit Sharma Captaincy : रोहित कर्णधारपदाचा राजीनामा देणार का? 'या' खेळाडूंकडे दिली जाऊ शकते जबाबदारी
- Arjun Tendulkar : अर्जून तेंडुलकर मैदानात उतरणार, मुंबई इंडियन्सची सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement