DC vs LSG, Match Highlights: चुरशीच्या सामन्यात अखेर दिल्ली पराभूत; लखनौ विजयासह पुढील फेरीच्या उंबरठ्यावर
IPL 2022, DC vs LSG : लखनौ सुपरजायंट्स संघाने दिल्ली कॅपिटल्सवर सहा धावांनी विजय मिळवला आहे.
DC vs LSG : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 45 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलसने लखनौ सुपरजायंट्सवर (MI vs LSG) 6 धावांनी विजय मिळवला आहे. अखेरच्या षटकापर्यंत गेल्याने सामना चुरशीचा झाला. पण निर्धारीत लक्ष्य पूर्ण न करु शकल्याने दिल्लीला 6 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. लखनौने प्रथम गोलंदाजी करत 195 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीसमोर 196 धावांचे आव्हान होते. हे आव्हान पार करताना 20 षटकात दिल्ली सात विकेट गमावत 189 धावाच करु शकल्याने सहा धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. आजच्या सामन्यातही लखनौचा कर्णधार केएल राहुलने दमदार खेळी केली. त्याला दीपक हुडानेही चांगली साथ दिली. गोलंदाजीत मोहसीन खानने चार षटकात चार विकेट घेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
सर्वात आधी सामन्यात नाणेफेकीनंतर लखनौ सुपरजायंट्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कर्णधार राहुलने घेतला आणि त्याने दीपकच्या मदतीने हा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. सुरुवातीला 23 धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी डी कॉकने केली. त्यानंतर मात्र राहुल आणि दीपक यांनी अप्रतिम भागिदारी करत संघाचा स्कोर 100 पार नेला. त्यानंतर दीपक 52 धावा करुन बाद झाला. काही वेळाने राहुलही 77 धावा करुन तंबूत परतला. अखेर मार्कस स्टॉयनिस (नाबाद 17) आणि कृणालने (नाबाद 9) धावा करत संघाचा स्कोर 195 धावांपर्यंत नेला. ज्यामुळे आता दिल्लीला 196 धावा करायच्या होत्या.
196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली अवघ्या 13 धावांत दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. त्यानंतर मिचेल मार्श आणि ऋषभ पंतने एक मोठी भागिदारी रचली. पण मार्श 37 धावा करुन बाद झाला. मग पंतही 44 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर अष्टैपूल रोवमेन पोवेलने धडाकेबाज कामगिरी सुरु केली. पण 21 चेंडूत 35 धावा करुन तोही बाद झाला. सामन्यात नाबाद 42 धावांची तगडी खेळी करणाऱ्या अक्षरला खास साथ मिळाली नाही. कुलदीप यादवनेही नाबाद 16 धावा केल्या, ज्यामुळे दिल्लीचा संघ अखर 6 धावानी जिकंला.
हे ही वाचा -