DC vs GT Live Score : दिल्लीचा सलग दुसरा पराभव, गुजरातने सहा विकेटने हरवले
हार्दिक पांड्या आणि डेविड वॉर्नर आमने सामने असतील... कोण बाजी मारणार...त्याचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
LIVE
Background
IPL 2023, Match 7, DC vs GT :
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये सातवा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans ) आणि दिल्ली कॅपिटल्सविरोधात (Delhi Capitals) रंगणार आहे. हा सामना 4 एप्रिल रोजी मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 हा च्या सातवा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर होणार आहे. आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स खातं उघडण्यासाठी गुजरात विरोधात मैदानात उतरणार आहे. तर, गुजरात टायटन्सचं लक्ष्य सलग दुसऱ्या विजयावर असतील.
IPL 2023, DC vs GT : दिल्लीच्या मैदानावर गुजरातची कसोटी
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा )Delhi Capitals vs Gujarat Titans) शनिवारी केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सकडून 50 धावांनी पराभव झाला. होम ग्राऊंडवर याचा बदला घेण्याचा प्रयत्न दिल्लीचा संघ करेल. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने शुक्रवारी आयपीएल 2023 च्या सलामी सामन्यात धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला.
IPL 2023, DC vs GT : गुजरात विजयाचा पॅटर्न कायम ठेवणार?
गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीपूर्वी दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करेल. आता मुश्ताफिजुर रहमान दिल्ली संघात सामील झाला आहे. संघ त्यांच्या सुरुवातीच्या प्लेईंग 11 मध्ये फक्त तीन परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवू शकतो आणि इम्पॅक्ट प्लेयरच्या पर्यायाच्या सेटमधून एका भारतीय खेळाडूला परदेशी पर्यायासह बदलू शकतो.
दिल्ली संभाव्य प्लेइंग 11 :
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ललित यादव, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार
गुजरात संभाव्य प्लेइंग 11 :
शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ
लाईव्ह सामना कुठे पाहाल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
GT vs DC Pitch Report : कशी असेल खेळपट्टी?
अरुण जेटली स्टेडियमच्या मैदानावर अनेक उच्च मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.
दिल्लीचा सलग दुसरा पराभव, गुजरातने सहा विकेटने हरवले
साई सुदर्शनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरवर गुजरातने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. दिल्लीने दिलेले 164 धावांचे आव्हान दिल्लीने सहा विकेट आणि 11 चेंडू राखून पार केले. गुजरातचा हा सलग दुसरा विजय होय... गुजरातने पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव केला होता. तर आज दिल्लीला आस्मान दाखवले. दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव होय. दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातचा संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे.
गुजरातची विजयाकडे वाटचाल, साई सुदर्शनचे अर्धशतक
गुजरातची विजयाकडे वाटचाल, साई सुदर्शनचे अर्धशतक
गुजरातला चौथा धक्का, विजय शंकर बाद
गुजरातला चौथा धक्का, विजय शंकर बाद
गुजरातला तिसरा धक्का, कर्णधार हार्दिक पांड्या बाद
गुजरातला तिसरा धक्का, कर्णधार हार्दिक पांड्या बाद
गुजरातला दुसरा धक्का, शुभमन गिल बाद
गुजरातला दुसरा धक्का, शुभमन गिल बाद