CSK vs RCB: चेन्नईविरुद्ध विराट रचणार इतिहास, विक्रमापासून फक्त 52 धावा दूर; केवळ रोहितचं करू शकला अशी कामगिरी
CSK vs RCB: आयपीएल पंधराव्या हंगामातील 22 व्या सामन्यात चेन्नईचा संघ आरसीबीशी भिडणार आहे.
CSK vs RCB: आयपीएल पंधराव्या हंगामातील 22 व्या सामन्यात चेन्नईचा संघ आरसीबीशी भिडणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नव्या विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे. या विक्रमापासून विराट कोहली फक्त 52 धावा दूर आहे.
विराट कोहली रचणार इतिहास
चेन्नईविरुद्ध आजच्या सामन्यात विराट कोहलीनं आणखी 52 धावा केल्यास एका संघाविरोधात 1000 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाणार आहे. विराट कोहलीनं चेन्नईविरुद्ध आतापर्यंत 28 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 41.22 सरासरीनं 948 धावा केल्या आहेत. ज्यात 9 अर्धशतकांचा समावेश आहे. केवळ मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर या विक्रमाची नोंद आहे. त्यानं कोलकाताविरुद्ध 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. एका संघाविरुद्ध 1000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा रोहित शर्मा एकमेक खेळाडू आहे.
पिच रिपोर्ट
मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही. येथे लक्ष्याचा पाठलाग करताना संघानं 4 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय, दोन वेळा प्रथम फलंदाजी करताना संघानं विजय मिळवला आहे. दव असल्यामुळं दुसऱ्या डावात गोलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा स्थितीत नाणेफेक जिंकून संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
संघ-
चेन्नईचा संघ-
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एम.एस. धोनी (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, मुकेश चौधरी, अॅडम मिल्ने.
बंगळुरूचा संघ-
अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, डेविड विली, वानिंदू हसरंगा, सिद्धार्थ कौल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
हे देखील वाचा-
- Akshar की Axar? दिल्लीच्या ऑलराऊंडरच्या स्पेलिंगमागचं नेमकं रहस्य काय? नक्की वाचा
- Washington Sundar Injured: हैदराबादची चिंता वाढणारी बातमी, वॉशिंग्टन सुंदरला दुखापत, पुढील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता
- Hardik Pandya's New Record: हार्दिक पांड्यानं ठोकलं षटकारांचं शतक, भारताच्या दिग्गज फलंदाजांना टाकलं मागं