CSK vs PBKS IPL 2023 : चेन्नईनं नाणेफेक जिंकली, पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय; प्लेईंग 11कशी आहे?
CSK vs PBKS IPL 2023 : चेन्नईनं नाणेफेक जिंकली, पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघांची प्लेईंग 11कशी आहे, जाणून घ्या.
CSK vs PBKS, IPL 2023 Live : आज आयपीएलचा (IPL 2023) 40 वा सामना चेपॉक स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकली असून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघ घरच्या एम. चिन्नास्वामी स्डेडिअम म्हणजेच चेपॉक मैदानावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरेल. दोन्ही संघांमधील हा सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांना मागच्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची आज संधी आहे.
चेन्नई विरुद्ध पंजाब, 'हे' खेळाडू दमदार फॉर्ममध्ये
चेन्नई संघातील अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे हे खेळाडू दमदार फॉर्ममध्ये आहेत. दुसरीकडे पंजाब संघाचा कर्णधार शिखर धवन याचीही यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार खेळी पाहायला मिळत आहे. मागील काही सामन्यांमध्ये प्लेईंग 11 मधून बाहेर असलेला धवन गेल्या सामन्यात मैदानावर परतला पण, या सामन्यात त्यांना चेन्नईकडून पराभव मिळाला. धवनशिवाय पंजाबचा युवा फलंदाज अर्थव तायडे याने मागील सामन्यात एक हाती झुंज दिली होती. त्यासोबत जितेश शर्माने छोटेखानी दमदार खेळी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात या खेळाडूंवर लक्ष असेल.
CSK vs PBKS Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई (CSK) आणि पंजाब (PBKS) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई संघ वरचढ असल्याचं दिसून येतं. चेन्नई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 15 सामने जिंकले आहेत. तर पंजाब संघाला 12 सामने जिंकण्यात यश मिळालं.
CSK vs PBKS, IPL 2023 : दोन्ही संघांची प्लेईंग 11
CSK Playing 11 : चेन्नई प्लेईंग 11
ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, महेंद्र सिंह धोनी, महिशा पथिराना, तुषार देशपांडे, महिशा तीक्षणा.
PBKS Playing 11 : पंजाब प्लेईंग 11
शिखर धवन, अर्थव तायडे, लियाम लिव्हिंगस्टोंग, सिकंदर रझा, सॅम करन, जितेश शर्मा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंह.
Chepauk Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.