CSK vs DC: चेन्नई आणि दिल्ली यांच्यात रंगणार सामना, कधी कुठे पाहणार सामना?
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) एकमेकांशी भिडणार आहेत.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) एकमेकांशी भिडणार आहेत. यंदाच्या हंगाम चेन्नईच्या संघासाठी खराब ठरला आहे. चेन्नईच्या संघाला केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, दिल्लीनं यंदाच्या हंगामात दहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीचा संघ चेन्नईविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
कधी, कुठे आहे सामना?
आज 08 मे रोजी होणारा हा चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेईंग इलेव्हन:
चेन्नई सुपर किंग्स:
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी, महेश तिक्षणा.
दिल्ली कॅपिटल्स:
डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, अॅनरिक नॉर्टजे.
हे देखील वाचा-