(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PBKS vs RR, IPL 2022: राजस्थानचा पंजाबवर सहा विकेट्सनं विजय, पाहा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे
PBKS vs RR, IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 52 व्या सामन्यात राजस्थानच्या संघानं पंजाबला पराभूत केलंय.
PBKS vs RR, IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 52 व्या सामन्यात राजस्थानच्या संघानं पंजाबला पराभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्युत्तरात राजस्थानच्या संघानं 6 विकेट्स राखून पंजाबला पराभूत केलं. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालनं (Yashasvi Jaiswal) 68 धावांची वादळी खेळी केली.
पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स सामन्यातील महत्वाचं दहा मुद्दे-
- राजस्थानविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या जॉनी बेअरस्टो आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली.
- पंजाबच्या डावातील सहाव्या षटकात आर अश्विनच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेल बाद झाला.
- बेअरस्टो आणि भानुका राजपक्षेनं संघाचा डाव सावरत पुढे नेला. मात्र, दहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर भानुका राजपक्षेनं आपली विकेट्स गमावली. पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल स्वस्तात माघारी परतला.
- पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. राजस्थानकडून युजवेंद्र चहलनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या आहेत.
- पंजाबनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरनं राजस्थानला संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 46 धावांची भागेदारी केली.
- परंतु, पंजाबच्या डावातील तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कागिसो रबाडानं जोस बटलरला जाळ्यात अडकवलं. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही स्वस्तात माघारी परतला.
- दरम्यान, यशस्वी जैस्वालनं संघाची एक बाजू संभाळत संघाचा डाव पुढे नेला. त्यानं 41 चेंडूत 68 धावांची वादळी खेळी केली
- राजस्थान रॉयल्सनं 8 विकेट्स राखून पंजाब किंग्जला पराभूत केलं.
- पंजाबकडून अर्शदीप सिंह सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या आहेत. तर, कागिसो रबाडा आणि ऋषी धवन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.
हे देखील वाचा-
Sanju Samson: इतका कमनशिबी कर्णधार! संजू सॅमसन सोशल मीडियावर होतोय ट्रोल, कारण जाणून व्हाल थक्क
PBKS Vs RR, IPL 2022: जॉनी बेअरस्टोचं अर्धशतक, पंजाबचं राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य