CSK Retention List IPL 2025 : चेन्नईच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली! CSKकडून दिवाळी गिफ्ट, MS धोनीसाठी किती पैसे मोजले?
CSK Retention List IPL 2025 : लीगचा सर्वात मोठा स्टार एमएस धोनी पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीत ॲक्शन करताना दिसणार आहे.
Chennai Super Kings Retention List IPL 2025 : आयपीएल मेगा लिलावापूर्वी चाहत्यांची सर्वाधिक नजर कोणत्या संघावर होती, याची रिटेन्शन लिस्ट समोर आली आहे. लीगचा सर्वात मोठा स्टार एमएस धोनी पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीत ॲक्शन करताना दिसणार आहे. पुरुष क्रिकेटमध्ये 3 आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या जगातील एकमेव कर्णधाराला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवावे लागले ही आणखी एक बाब आहे.
Super 5️⃣quad REPRESENT! 🦁🔥#UngalAnbuden #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/dIhMwAEqoG
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 31, 2024
चेन्नई सुपर किंग्जने धोनीला आयपीएल 2025 मध्ये 4 कोटी रुपयांच्या किमतीत अनकॅप्ड खेळाडू म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीने गेल्या हंगामात ज्या प्रकारे खालच्या स्थानावर फलंदाजी केली, ते पाहता त्याच्या खेळावर सस्पेंस होता, पण आता यावरून पूर्णपणे पडदा हटला आहे.
धोनीव्यतिरिक्त, सीएसकेने चार खेळाडूंना रिटेन केले आहे त्यात ऋतुराज गायकवाड, मथिसा पाथिराना, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्स हा या लीगमधील सर्वात यशस्वी संघ असून धोनीच्या नेतृत्वाखाली 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. चेन्नई आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवण्यासाठी ओळखले जाते आणि हे पुन्हा एकदा पाहिला मिळाले.
Yellove is the only constant! No matter what, the memories in our hearts will always be ours to cherish! #UngalAnbuden 💛,
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 31, 2024
Pride Of 2024#WhistlePodu #Yellove pic.twitter.com/DA1qKIp5nO
चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजा आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांना प्रत्येकी 18 कोटी रुपयांच्या सर्वाधिक रकमेवर कायम ठेवले आहे. तर, मथिशा पाथिरानाला 13 कोटी आणि शिवम दुबेला 12 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. चेन्नईने तीन-चार कॅप्ड आणि एक अनकॅप्ड खेळाडू कायम ठेवले. आता तो राईट टू मॅच कार्डने लिलावात कोणत्याही कॅप्ड खेळाडूची निवड करू शकतो.
आयपीएल 2024 मध्ये चेन्नईचा संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही. गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होता. 14 सामन्यांपैकी संघाला 7 जिंकता आले तर 7 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
हे ही वाचा -