IPL 2022 : बुमराहचा भेदक मारा, कोलकात्याची दाणादाण, मोठ्या विक्रमाला गवसणी
Jasprit Bumrah in IPL 2022 : बुमराहने आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. बुमराहने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट घेण्याचा पराक्रम केलाय.
IPL 2022 : जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे कोलकात्याच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. कोलकाताविरोधात जसप्रीत बुमराह लयीत दिसत होता. बुमराहच्या गोलंदाजीपुढे कोलकात्याच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. बुमराहने आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. बुमराहने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट घेण्याचा पराक्रम केलाय.
कोलकाताविरोधात बुमराहने चार षटकात फक्त 10 धावा खर्च करत पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. बुमराहने एक षटक निर्धाव टाकले. तर अखेरच्या षटकात फक्त एक धाव दिली. बुमराहने पहिल्यापासूनच अचूक टप्यावर गोलंदाजी करत कोलकात्याच्या फलंदाजांना बांधून ठेवले. बुमराहने नीतीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डॉन जॅक्सन, पॅट कमिन्स आणि सुनिल नारायण यांना बाद केले.
बुमराहाच्या दुसऱ्या स्पेल आधी कोलकाता सुस्थितीत होता. बुमराह दुसरा स्पेल टाकायला येण्याआधी कोलकाता तीन बाद 136 अशा सुस्थितीत होता. पण नंतर बुमराहने भेदक मारा करत कोलकात्याच्या फलंदाजांना बाद केले. सामन्याच्या अखेर कोलकाताची स्थिती 9 बाद 165 झाली. बुमराहने आयपीएलच्या इतिहासातील आपली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. अल्जारी जोसेपने 12 धावांत सहा विकेट घेतल्या होत्या. सोहल तन्वीरने 14 धावांत सहा विकेट घेतल्या होत्या. तर अॅडम झम्पानेही 19 धावा देत सहा विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर अनिल कुंबळेने पाच धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या होता. आता बुमराहन या पंक्तीत स्थान पटकावलेय. बुमराहने दहा धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या आहेत. अनिल कुंबळेनंतर बुमराह सर्वोत्कृष्ट दुसरा बॉलर ठरलाय.
आयपीएलच्या पहिल्या दहा सामन्यात बुमराहाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. बुमराहने पहिल्या दहा सामन्यात 294 धावा खर्च करत पाच विकेट घेतल्या होत्या. तर आजच्या सामन्यात फक्त दहा धावा देत पाच विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या 11 सामन्यात बुमराहने 304 धावांच्या मोबदल्यात 10 विकेट घेतल्यात.
बुमराहने टाकलेले 24 चेंडू -
4,0,1,0,0,0,0,W,2,1,W,1,W,0,W,W,0,0,0,0,0,0,0,1 - 5/10.
राणा-वेंकटेशची दमदार फलंदाजी -
जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे कोलकाता संघाने निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कोलकात्याकडून अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर यांनी दमदार सलामी दिली. 5.4 षटकांत त्यांनी 60 धावांची सलामी दिली. वेंकटेश अय्यर 43 धावा काढून माघारी परतला. चार षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने अय्यरने 43 धावा चोपल्या. अय्यरनं अजिंक्य रहाणेही लगेच माघारी परतला. रहणेने 25 धावा काढळ्या. नीतीश राणानेही 43 धावांची खेळी केली. अय्यर, रसेल, शेल्ड जॅक्सन, पॅट कमिन्स आणि सुनिल नारायण यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. यांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. कर्णधार अय्यर सहा तर रसेल 9 धावा काढून बाद झाला. रिंकू सिंहने अखेरच्या षटकात फटकेबादी करत कोलकात्याचा डाव 160 पार नेला. सुनील नारायण, पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्ती यांना खातेही उघडता आले नाही.