एका वर्षात 2 IPL? टी20 ऐवजी T10 फॉरमॅट; BCCI क्रिकेटप्रेमींना मोठी गूड न्यूज देण्याच्या तयारीत
2 IPL in One Calendar Year: मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) वर्षातून दोनदा ही लीग आयोजित करण्याची योजना आखत आहे.
BCCI To Host 2 IPL in One Calendar Year: येत्या काही दिवसांतच आयपीएल 2024 च्या (IPL 2024) आगामी सीझनला सुरुवात होणार आहे. अशातच क्रिकेटप्रेमींमध्ये अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगबाबत (Indian Premier League) मोठी अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) वर्षातून दोनदा ही लीग आयोजित करण्याची योजना आखत आहे. सध्या आयपीएल लीगचा 17 वा सीझन 22 मार्चपासून खेळवलं जाणार आहे. आयपीएल 2024 ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यानं होणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, याआधी टीम इंडियाचे (Team India) माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही एका वर्षात दोन आयपीएल झाल्याची चर्चा केली होती. एका वर्षात दोन आयपीएलबद्दल रवी शास्त्री पहिल्यांदाच बोलले असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. आयपीएलची दिवसागणिक वाढती लोकप्रियता लक्षात घेत, एका वर्षात लवकरच दोन आयपीएलचं आयोजन केलं जाऊ शकतं, असे ते म्हणाले होते.
आता एका वर्षात दोन IPL?
बीसीसीआय एक वर्षात दोन आयपीएल घेण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. पण यामध्ये अनेक आव्हानं आहेत. योग्य विंडो शोधणं हे बीसीसीआयसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. किंबहुना, वर्षभरात दोन आयपीएल खेळणं शक्य होईल, जर वर्षभरात आयसीसीचा कोणताही कार्यक्रम नसेल किंवा अनेक द्विपक्षीय मालिका आयोजित केल्या गेल्या नसतील तरच बीसीसीआय याबाबत ठोस निर्णय घेऊ शकते. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सध्या हे आव्हान स्विकारलं आहे. तसेच, यासंदर्भात योग्य पर्याय शोधण्याबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे. "आम्हाला 84 सामने आणि नंतर 94 सामन्यांसाठी विंडो शोधण्याची गरज आहे.", असं त्यांनी टेलिग्राफला सांगितलं.
IPL T20 ऐवजी T10 फॉरमॅटमध्ये होणार?
बीसीसीआयसाठी एकाच वर्षात दोन आयपीएलसाठी विंडो शोधणं सोपं नसेल. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय दुसऱ्या आयपीएलला टी20 ऐवजी टी10 फॉरमॅटमध्ये खेळवण्याची शक्यता आहे. यामुळे कमी विंडोमध्ये सामने खेळवणं सहज शक्य होईल. दरम्यान, आयपीएल चेअरमन अरुण धूमल यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, टी10 फॉरमॅटसंदर्भात अद्याप कोणकीही चर्चा झालेली नाही. दरम्यान, भविष्यातील कोणताही निर्णय खेळाच्या हिताचा विचार करून घेतला जाईल, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
WTC 2023-25 Point Table: WTC पॉईंट टेबलमध्ये टीम इंडियाच बॉस; जिंकूनही ऑसी संघ पिछाडीवरच!