एक्स्प्लोर

वडीलांची पान टपरी, आईचा क्रिकेटला विरोध; आयपीएलमध्ये लागली 10 कोटींची बोली,  Avesh Khan चा संघर्षमय प्रवास

Avesh Khan Story: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये अनकॅप खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडलाय. अनकॅप खेळाडूंवर मूळ किंमतीपेक्षा अधिक पैशांचा वर्षाव करण्यात आलाय.

Avesh Khan Story: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये अनकॅप खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडलाय. अनकॅप खेळाडूंवर मूळ किंमतीपेक्षा अधिक पैशांचा वर्षाव करण्यात आलाय. राहुल तेवातिया आणि शाहरुख खान यांच्यासाठी तब्बल 9-9 कोटी रुपये मोजले. पण इंदूरचा क्रिकेटर आवेश खाननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसताना लखनौ सुपर जायंट्सनं त्याला 10 कोटी रुपयांत विकत घेतलंय. आवेश खाननं आयपीएलच्या मागच्या हंगामात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. या कामगिरीचं फळ त्याला आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये मिळालंय, असं बोलणं वावग ठरणार नाही. 

आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये आवेश खानवर मोठी बोली लागणे, ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट मानली जात आहे. आवेश हा गरीब कुटुंबात जन्माला आलाय. त्याचे वडील आशिक खान इंदूरमध्येच पानाचे दुकान चालवतात. आशिक खान यांना त्यांच्या मुलाला भारताकडून खेळताना पाहायचं आहे. आवेश लहान असताना तो फक्त क्रिकेट खेळण्याचा हट्ट कराचचा. तो सर्व काम सोडून क्रिकेट खेळायचा. आवेश दिवसांत 8 तास क्रिकेटचा सराव करायचा, असं आशिक यांनी सांगितलंय. परंतु, आवेशच्या आईला त्याचं क्रिकेट खेळणं आवडत नव्हतं. कारण, आवेश हा भविष्यात मोठा खेळाडू बनू शकणार नाही, असं त्यांना वाटायचं.

आवेश खानचा जन्म 13 डिसेंबर 1996 मध्ये इंदौर येथे झालाय. त्यानं 2017 मध्ये बंगळुरूच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होत. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2018 ला त्यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. आवेश खान उत्तर प्रदेशच्या संघाकडून 'अ' श्रेणी क्रिकेटमध्ये खेळला होता. 2018 साली त्याची दिल्ली कॅपिटल्सच्या संघात निवड झालीय. दिल्लीकडून आवेशनं 16 सामन्यांत 24 बळी घेतले. आवेश हा सुमारे 140 च्या वेगानं गोलंदाजी करतो.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget