Video : नको रडू ना.... लखनौला मॅच जिंकून देणारा आवेश खान फोनवर बोलत होता ...अन् अश्रूंच्या रुपात फुटला मातेच्या भावनांचा बांध!
जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला, ज्यामध्ये लखनौने फक्त 2 धावांच्या फरकाने विजय मिळवला

Avesh Khan mother IPL 2025 : आयपीएल 2025 चा 36 वा सामना या हंगामातील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक ठरला. जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला, ज्यामध्ये लखनौने फक्त 2 धावांच्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यानंतर असा एक दृश्य पाहायला मिळाला जो कोणालाही भावनिक करेल. हे दृश्य एका आईला तिच्या मुलाला भेटण्याचे होते, ज्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. हा खेळाडू होता वेगवान गोलंदाज आवेश खान.
जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्स जिंकणार असे वाटत होते, पण उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आवेश खानने त्याच्या शेवटच्या 2 षटकांमध्ये सामना फिरवला. 18व्या षटकात आवेशने यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांची विकेट घेतली. त्यानंतर 20 व्या षटकात, जेव्हा राजस्थानला फक्त 9 धावांची आवश्यकता होती, तेव्हा त्याने फक्त एक विकेट घेतली आणि फक्त 6 धावा देऊन संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
...अन् अश्रूंच्या रुपात फुटला मातेच्या भावनांचा बांध!
अवेश या सामन्याचा स्टार ठरला आणि त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. अर्थातच हे त्याच्यासाठी खूप खास होते, पण त्याहूनही महत्त्वाचा क्षण आला, जेव्हा त्याला त्याच्या आईला भेटण्याची संधी मिळाली. या विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सने एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये आवेश आणि त्याच्या आईमधील हा भावनिक क्षण कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये, आविश त्याच्या आईशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे, तर त्याची आई रडत आहे.
यावेळी, आवेश तिला रडू नको म्हणतो. केवळ आवेशच नाही तर त्याचा सहकारी निकोलस पूरन देखील आईला हसण्यास सांगतो. पण काही वेळाने, आवेश स्टेडियमच्या दुसऱ्या बाजूने आईकडे जातो, त्यावेळी आवेश समोर येताच त्याच्या आईने रडत त्याला मिठी मारली. हे पाहून तिथे उपस्थित असलेले इतर लोकही भावुक झाले. या काळात केवळ त्याची आईच नाही तर आवेशचे वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यही त्यांच्या स्टारला भेटले.
View this post on Instagram
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 180 धावा केल्या. यावेळी अॅडम मार्क्रम वगळता एलएसजीचा टॉप ऑर्डर अपयशी ठरला. मार्श, पूरन, ऋषभ हे सगळे स्वस्तात बाद झाले. पण, मार्कराम (66) आणि आयुष बदोनीच्या 50 धावा आणि अखेर अब्दुल समदच्या 10 चेंडूत तुफानी 30 धावा यामुळे संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. प्रत्युत्तर, राजस्थानने चांगली सुरुवात केली, पण अखेर 178 धावा केल्यानंतर 2 धावांनी सामना गमावला.





















