Andre Russell Dances With Ananya Pandey: लुट पुट गया...; आंद्रे रसेल अन् अनन्या पांडेचा डान्स, सोशल मीडियावर फक्त या व्हिडीओचीच चर्चा
IPL 2024 Final Andre Russell Dances With Ananya Pandey: आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी शाहरुख खान, पत्नी गौरी, मुलगी सुहाना, मुलगा आर्यन खान, अनन्या पांडे देखील इडन गार्डन्वर उपस्थित होते.
IPL 2024 Final Andre Russell Dances With Ananya Panday: आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवण्यात आला. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्या झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने बाजी मारली. कोलकाताने हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव करत एकतर्फी विजय मिळवला.
कोलकाताने हा विजय मिळवत आयपीएलमधील 10 वर्षांचा दुष्काळ संपवला. कोलकाताने 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात आयपीएलचा हंगाम जिंकला होता. त्यानंतर 10 वर्षांनी कोलकाताला आयपीएलच्या चषकावर नाव कोरण्यात यश आलं. कोलकाताच्या या विजयानंतर जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. अंतिम सामना पाहण्यासाठी बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, पत्नी गौरी, मुलगी सुहाना, मुलगा आर्यन खान, अभिनेत्री अनन्या पांडे देखील इडन गार्डन्वर उपस्थित होते. कोलकाताच्या विजयानंतर सर्वांनी खेळाडूंसोबत सेलिब्रेशन केले. याचदरम्यान अनन्या पांडेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये काय?
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनन्या पांडे आणि कोलकाताचे खेळाडू दिसून येत आहे. कोलकाताच्या या खेळाडूंसोबत प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनीही जोरदार डान्स केला. व्हिडीओमध्ये अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आणि अनन्या शाहरुख खानच्या चित्रपटातील लूट-पूट गया...या गाण्यावर नाचताना दिसत आहे.
Andre Russell enjoying "Lutt Putt Gaya" Song during the IPL winning Party. 😄👌 pic.twitter.com/Q8sg53FuFi
— Johns. (@CricCrazyJohns) May 27, 2024
'फ्लाईंग किस' देऊन आनंद साजरा केला
आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर शाहरुख खान आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंनी 'फ्लाईंग किस' देऊन आनंद साजरा केला. या पोझची या सीझनमध्ये खूप चर्चा झाली आहे. यासाठी कोलकाताचा खेळाडू हर्षीत राणाला दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी कोलकाता नाइट रायडर्सने असा आनंद साजरा केल्याचे काही लोकांचे मत आहे. फ्लाईंग किस केल्याबद्दल बीसीसीआयने हर्षित राणाला दंड आणि बंदी घातली होती. वास्तविक, IPL 2024 च्या तिसऱ्या सामन्यात हर्षीत राणाने सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर त्याला फ्लाईंग किस दिली होती. त्यानंतर हर्षीतवर बंदी घालण्यात आली आणि हे प्रकरण चर्चेत आले.