(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टीम इंडिया वेस्ट इंडीजला पोहोचताच पैशांचा पाऊस पडतो, भारताच्या राष्ट्रपतींच्या भेटीनंतर जेसीए प्रमुखांचं मोठं वक्तव्य
Wilfred Billy Heaven On Team India West Indies Tour: भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी जमैका क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख विल्फ्रेड बिली हेवन यांना 100 क्रिकेट किट भेट दिली.
Wilfred Billy Heaven On Team India West Indies Tour: भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी जमैका क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख विल्फ्रेड बिली हेवन (Wilfred Billy Heaven) यांना 100 क्रिकेट किट भेट दिली. त्यानंतर विल्फ्रेड बिली हेवन यांनी जमैकाच्या लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघ जेव्हा वेस्ट इंडिजचा दौरा करतो आणि जमैकामधील सबिना पार्क येथे दोन्ही संघात सामने खेळला जातो, यातून खूप फायदा होतो. भारत वेस्ट इंडीज यांच्यातील सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवतात. याशिवाय, भारतीय क्रिकेट संघाच्या दौऱ्यातून वेस्ट इंडीज बोर्डाला भरपूर पैसा मिळतो. हा आमच्यासाठी पैसे कमवण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे, असंही बिली हेवन यांनी म्हटलं आहे.
जमैकाच्या लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या चार दिवसांच्या जमैका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी जमैका क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख विल्फ्रेड बिली हेवन यांना 100 क्रिकेट किट भेट दिली. या भेटीनंतर विल्फ्रेड बिली हेवन यांनी रामनाथ कोविंद यांचे आभार मानले. तसेच जमैकाच्या लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतासारख्या राष्ट्राकडून अशा भेटवस्तू मिळणे ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
यामुळं दोन्ही देशांतील संबंध चांगले होतील
विल्फ्रेड बिली हेवन पुढे म्हणाले की, "भारताच्या भेटवस्तूमुळं दोन्ही देशातील संबंध चांगले होतील. याशिवाय देशातील युवांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित करेल आणि जाऊन हेच खेळाडू देशासाठी क्रिकेट खेळतील. त्यावेळी त्यांनी ख्रिस गेल आणि आंद्रे रसलचंही उदाहरण दिलं. देशातील तरूण देशासाठी क्रिकेट खेळण्यासाठी उस्तुक आहेत. पण ते थोडे महाग आहे. त्यामुळं बहुतांश तरुणांना पुढे खेळता येत नाही. सध्या कॅरेबियन देशातील 17 खेळाडू भारतात आयपीएल खेळत आहेत. ज्यातील चार खेळाडू जमैका येथील आहेत. आम्ही क्रिकेटच्या चांगल्या विकासासाठी काम करत आहोत, जेणेकरून तरुणांना चांगल्या सुविधा मिळतील", असंही त्यांनी म्हटलं आहे.
हे देखील वाचा-