Kane Williamson : मुंबईविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून देताच कर्णधार केन विल्यमसन मायदेशी परतला, काय आहे कारण?
MI vs SRH : मुंबईविरुद्ध पार पडलेल्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा हैदराबादने 3 धावांनी पराभव केला आहे.
Kane Williamson For SRH : सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्त्वाखाली संघाने मुंबई इंडियन्सला अवघ्या तीन धावांनी मात दिली. या विजयासह हैदराबादने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. पण संघाचा कर्णधारचं या विजयानंतर मायदेशी परतला आहे. केनची पत्नी सारा लवकरच एका मुलाला जन्म देणार असल्याने केन पुन्हा मायदेशी परतला आहे. सनरायजर्स हैदराबादने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. आयपीएल 2022 संपण्यापूर्वीच केनला मायदेशी परतावं लागलं आहे. त्यामुळे हैदराबादला पुढील सामन्यात अडचण सहन करावी लागू शकते.
वर्ल्ड क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा फलंदाज आणि कर्णधार केन विल्यमसन यंदा सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व करत होता. पण संघाकडून आणि केनकडून यंदा खास कामगिरी झाली नसल्याने त्यांची पुढील फेरीत पोहोचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. संघाने 12 पैकी 7 सामने गमावल्याने त्यांचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं होतं. पण मंगळवारी त्यांनी मुंबईवर 3 धावामनी विजय मिळवत स्पर्धेत 6 विजयांह 12 गुण खात्यात जमा केले आहेत. त्यांचा अजून एक सामना शिल्लक असून तो चांगल्या फरकाने जिंकल्यास त्यांचे अजूनही पुढील फेरीत पोहोचण्याचे चान्सेस आहेत. अर्थात हे सर्वा इतर संघाच्या खेळावरही अवंलंबून असणार आहे.
हैदराबादचा पुढील सामना पंजाबशी
हैदराबाद संघाचा पुढील सामना पंजाब किंग्सशी रविवारी 22 मे रोजी होणार आहे. या सामन्यात संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. दरम्यान यावेळी संघाचा कर्णधार म्हणून भुवनेश्वर कुमारला संधी दिली जाऊ शकते. संघातील एक वरिष्ठ खेळाडू असून त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. त्यामुळे भुवनेश्वरकडे ही जबाबदारी दिली जाऊ शकते.
मुंबईवर 3 धावांनी विजय
मुंबईविरुद्ध (Mumbai Indians) सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) उमरान मलिकनं (Umran Malik) चमकदार कामगिरी करून दाखवली. या सामन्यात त्यानं मुंबईच्या तीन महत्वाच्या फलंदाजानं आपल्या जाळ्यात अकडलं. ज्यामुळं हैदराबादच्या संघानं सामन्यावर मजूबत पकड मिळवली. हैदराबादनं दिलेल्या 194 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाची दमछाक झाली. मुंबईनं 20 षटकात सात विकेट्स गमावून 190 धावा केल्या. हा सामना हैदराबादच्या संघानं तीन धावांनी जिंकला.
हे देखील वाचा-