एक्स्प्लोर

IPL 2022 : आयपीएलसोडून राजस्थानचा मॅचविनर खेळाडू मायदेशी परतला, पाहा व्हिडीओ 

Shimron Hetmyer : राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज शिमरोन हेटमायर आयपीएल अर्ध्यावरच सोडून मायदेशी परतलाय.

Shimron Hetmyer : राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज शिमरोन हेटमायर आयपीएल अर्ध्यावरच सोडून मायदेशी परतलाय. हेटमायर रविवारी सकाळी बायो बबलमधून बाहेर पडलाय. हेटमायरने मुंबईतून गुयानासाठी फ्लाईट पकडली. शिमरोन हेटमायर बायो बबलमधून जातानाचा व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. 

शिमरोन आयपीएलमधून का निघाला?
शिमरोन हेटमायर पहिल्यांदाच बाप होणार आहे. कुटुंबाकडून पत्नीच्या डिलिव्हरीबाबत माहिती मिळताच हेटमायर मायदेशी परतला आहे. 

 राजस्थानने शेअर केला व्हिडीओ -
राजस्थान रॉयलने शिमरोन हेटमायर बायो बबलमधून बाहेर निघतानाचा व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये हेटमायर जाताना सहकारी खेळाडू त्याला निरोप देताना दिसत आहेत. जेम्स नीशम, युजवेंद्र चहल, डेरिल मिचेल यांनी हेटमायरला शुभेच्छाही दिल्या.  

पुन्हा परतणार - 
हेटमायर मुंबईतून गुयानासाठी रवाना झाला. बाळाच्या जन्मानंतर हेटमायर पुन्हा राजस्थान संघासोबत जोडला जाणार आहे. पण नेमका कधी परतणार, याबाबत कोणताही माहिती अद्याप समोर आलेली नाही. शिमरोन हेटमायर आज सकाळी मायदेशी परतला आहे. लवकर तो माघारी परतणार आहे, असे राजस्थानने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय.  

 पाहा राजस्थानचे ट्विट - 

मॅचविनवर हेटमायर - 
यंदाच्या हंगामात शिमोरन हेटमायर लयीत दिसत आहे. हेटमायरने वादळी खेळी करत राजस्थानला अनेकदा सामना जिंकून दिलाय. हेटमायरने फिनिशिंगची अचूक भूमिका बजावली आहे. आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यात हेटमायरने 291 धावांचा पाऊस पाडलाय. 11 डावात हेटमायर सातवेळा नाबाद राहिलाय. हेटमायरने राजस्थानसाठी फिनिशिंग करताना 166.28 स्ट्राईक रेटने धावा चोपल्या आहेत. 

दरम्यान, मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर  (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 52 व्या सामन्यात राजस्थानच्या संघानं पंजाबला पराभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्युत्तरात राजस्थानच्या संघानं 6 विकेट्स राखून पंजाबला पराभूत केलं. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालनं (Yashasvi Jaiswal) 68 धावांची वादळी खेळी केली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात होणार महत्त्वाचा बदल, 'त्या' लोकल ट्रेन CSMT नव्हे तर दादर स्थानकातून सुटणार
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, 5 ऑक्टोबरपासून वेळापत्रकात होणार महत्त्वाचे बदल
Embed widget