(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajinkya Rahane : टीम इंडियात येण्यासाठी धडपड, पण आयपीएलमध्ये कोलकाता संघाची थेट मिळणार कॅप्टनसी
पुढील वर्षीच्या आयपीएल 2025 स्पर्धेचा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर दरम्यान जेद्दाहमध्ये पार पडला. या लिलावातून सर्वच फ्रँचायझींनी आपली संघबांधणी पूर्ण केली आहे.
Ajinkya Rahane KKR Captain : पुढील वर्षीच्या आयपीएल 2025 स्पर्धेचा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर दरम्यान जेद्दाहमध्ये पार पडला. या लिलावातून सर्वच फ्रँचायझींनी आपली संघबांधणी पूर्ण केली आहे. ज्यामध्ये आता काही संघ आहेत जे त्यांच्या नवीन कर्णधाराच्या शोधात आहेत. दरम्यान, आयपीएल 2024 च्या चॅम्पियन टीम कोलकाता नाइट रायडर्सने त्यांच्या नवीन कर्णधारासाठी नाव निश्चित केले आहे.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने व्यंकटेश अय्यरसाठी सर्वात मोठी रक्कम खर्च केली आणि 23.75 कोटी रुपये खर्च करून त्याला संघात समाविष्ट केले. आयपीएल 2025 साठी संघ कर्णधारपदाची जबाबदारी रिंकू सिंग किंवा व्यंकटेश अय्यर यांच्याकडे सोपवू शकतो, असे अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. मात्र ताज्या अहवालात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
KKR चा कर्णधार कोण होणार?
खरंतर, अहवालानुसार आयपीएल 2025 मध्ये केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते. रहाणेला कोलकाता नाईट रायडर्सने मेगा लिलावात त्याच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे. रहाणेला कर्णधारपद देण्यामागचे सर्वात मोठे कारण त्याचा अनुभव असल्याचे मानले जाते. रहाणेने आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेकदा चॅम्पियन बनवले आहे. यासोबतच रहाणेला आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपदाचाही चांगला अनुभव आहे.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना एका सूत्राने सांगितले की, “होय, अजिंक्य रहाणे केकेआरचा नवा कर्णधार असेल याची जवळपास 90 टक्के खात्री झाली आहे. रहाणेला या कारणासाठी संघाने विकत घेतले आहे.”
🚨 CAPTAIN AJINKYA RAHANE 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) December 2, 2024
Rahane emerged as the strong contender to lead KKR in IPL 2025. [Gaurav Gupta from TOI] pic.twitter.com/BSxQ3q1QHv
कर्णधार म्हणून रहाणेचा विक्रम
कर्णधारपदाखाली अजिंक्य रहाणेचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. रहाणेने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन भूमीवर ऐतिहासिक विजय मिळवून दिला. कोहलीची अनुपस्थिती आणि स्टार खेळाडूंच्या दुखापती असतानाही रहाणेने युवा खेळाडूंसोबत गाब्बाचा किल्ला सर केला होता. यासोबतच रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई रणजी ट्रॉफी आणि इराणी चषक स्पर्धेत चॅम्पियन ठरली. कर्णधारपदासोबतच रहाणेचा सध्याचा फॉर्मही जबरदस्त आहे.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत केरळविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रहाणेने 35 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी केली. गेल्या मोसमात केकेआरने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मात्र, मेगा लिलावापूर्वी कोलकाताने अय्यरला सोडले.
हे ही वाचा -