Ind vs Aus 2nd Test : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासाठी रचला सापळा, ॲडलेडमधून हृदयाच्या ठोके वाढवणारा फोटो आला समोर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका आता ॲडलेडला पोहोचली आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
IND vs AUS 2nd Test Adelaide Pitch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका आता ॲडलेडला पोहोचली आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी ॲडलेडच्या खेळपट्टीचा पहिला फोटो समोर आला आहे. ही खेळपट्टी पाहता फलंदाजांना येथे फलंदाजी करणे सोपे नसेल, असा अंदाज बांधला जात आहे. खेळपट्टीवर भरपूर गवत दिसत आहे. खेळपट्टी हिरवीगार ठेवण्यासाठी त्यावर भरपूर पाणी टाकले जात असल्याचेही बोलले जात आहे. याच्या मदतीने गोलंदाजांना भरपूर स्विंग आणि बाऊन्स मिळू शकतात.
The Adelaide pitch for the Pink Ball. (Revsportz). pic.twitter.com/glvLnWpJJf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 2, 2024
पर्थ कसोटी सामना 295 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर भारतासमोर आता पिंक बॉलचे आव्हान असणार आहे. पिंक बॉल क्रिकेट खेळण्यात कांगारू संघ खूप चांगला आहे आणि तो आजपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. अशा परिस्थितीत त्याला पराभूत करणे भारतासाठी सोपे नसेल. या मैदानावर गेल्या वेळी भारताने ऑस्ट्रेलियासोबत पिंक बॉलने कसोटी सामना खेळला होता, तेव्हा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या मैदानावर भारताच्या अशा काही आठवणी आहेत ज्या त्यांना विसरायला आवडेल.
पाच वर्षांपूर्वी खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने प्रथम खेळताना 244 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली होती, जिथे विराट कोहलीने 74 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने अप्रतिम गोलंदाजी करत चार बळी घेतले. यानंतर भारतीय गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 191 धावांत गुंडाळला. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वोत्तम कामगिरी करत 4 बळी घेतले, तर कांगारू संघासाठी टीम पेनने नाबाद 73 धावा करत एकाकी झुंज दिली.
📍 Manuka Oval, Canberra
— BCCI (@BCCI) December 2, 2024
Watch #TeamIndia's Pink Ball Match highlights against PM XI 🏏https://t.co/iRy84opPpE
मात्र, भारताच्या दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी कोसळली. येथे जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्सच्या जोडीने टीम इंडियाला अवघ्या 36 धावांवर ऑलआऊट करण्यास भाग पाडले. ही भारताची कसोटीतील सर्वात कमी धावसंख्या होती. अशाप्रकारे कांगारू संघाला केवळ 90 धावांचे लक्ष्य मिळाले, जे संघाने दोन गडी गमावून पूर्ण केले.
हे ही वाचा -