IPL 2025 : प्लेऑफ मॅचेसची ठिकाणं ठरली, आयपीएल फायनल 'या' मैदानावर होणार, BCCI नं केली मोठी घोषणा
IPL 2025 Final Venue: बीसीसीआयनं आयपीएल प्लेऑफमधील लढती कोणत्या ठिकाणी होणार हे जाहीर केलं आहे. आयपीएल फायनलचं ठिकाण देखील ठरलं आहे.

Ahmedabad Narendra Modi Stadium set to host IPL 2025 final नवी दिल्ली : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील प्लेऑफच्या लढती कुठं होणार यांसदर्भातील घोषणा बीसीसीआयनं केली आहे. आयपीएल फायनल गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. आयपीएल फायनल बदललेल्या वेळापत्रकानुसार 3 जूनला होणार आहे. क्वालिफायरची एक मॅच देखील याच मैदानावर होणार आहे. आयपीएलची पहिली क्वालिफायर मॅच 1 जूनला याच मैदानावर होईल.
क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटरबाबत अपडेट
आयपीएल 2025 ची पहिली क्वालिफायर मॅच 29 मे रोजी होणार आहे. ही मॅच न्यू चंदीगढ येथील मुल्लानपूर मध्ये होणार आहे. याशिवाय एलिमिनेटरची 30 मे रोजी होणारी मॅच देखील याच मैदानावर होईल. मात्र, यासंदर्भातील अधिकृत घोषणा झालेली नाही.
हवामानाची स्थिती पाहून बीसीसीआयनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. देशात पावसाळा सुरु होत आहे. यामुळं अंतिम फेरीच्या लढतीसाठी फायनलसाठी अहमदाबादची निवड करण्यात आली आहे.
प्लेऑफसाठी तीन संघ ठरले,मुंबई अन् दिल्लीत शर्यत
आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स यांनी प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चौथ्या स्थानासंदर्भात स्पर्धा सुरु आहे. चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स,सनरायजर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंटस, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंटस प्लेऑफच्या शर्यतीबाहेर गेले आहेत.
मुंबई इंडियन्स आणि दिल्लीमध्ये स्पर्धा
आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात स्पर्धा आहे. मुंबई इंडियन्स 14 गुणांसह सध्या चौथ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांचे दोन सामने बाकी आहेत. दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये जायचं असल्यास राहिलेल्या दोन्ही मॅचेस जिंकाव्या लागतील. तर, ते प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतात. दिल्ली आणि मुंबई इंडियन्स उद्या आमने सामने येणार आहेत. त्यानंतर या दोन्ही संघांची राहिलेली एक लढत पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे. पंजाब किंग्जनं श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं पंजाब सारख्या बलाढ्य संघा विरुद्ध दोन्ही संघांची कामगिरी कशी होते याकडे देखील लक्ष असेल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करते का ते उद्याच्या मॅचच्या निकालावर ठरेल. जर उद्या मुंबईनं मॅच जिंकली आणि ते पंजाबविरुद्ध पराभूत झाले तरी ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. कारण, दिल्ली कॅपिटल्सनं जर एक मॅच गमावली आणि एक जिंकली तर त्यांचे गुण 15 होतील.




















