IPL सामन्यात फेकलेल्या एका बॉलमधून बीसीसीआयला मिळणार 49 लाख; एका सामन्यातून होणार 118 कोटींचा फायदा
IPL Media Rights Auction 2022 : आयपीएल मीडिया राइट्सची विक्री पूर्ण झाली असून चारही पॅकेज 48 हजार कोटी 390 रुपयांना विकले गेले आहेत. त्यामुळे बीसीसीआयला आता आयपीएल सामन्यातून आणखी फायदा होणार आहे.
![IPL सामन्यात फेकलेल्या एका बॉलमधून बीसीसीआयला मिळणार 49 लाख; एका सामन्यातून होणार 118 कोटींचा फायदा After IPL Media Rigths Auction now onwards BCCI will earn 49 lakhs from every ball thrown in match 118 crores benifet from one match IPL सामन्यात फेकलेल्या एका बॉलमधून बीसीसीआयला मिळणार 49 लाख; एका सामन्यातून होणार 118 कोटींचा फायदा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/15/98005c7b1f1e22c202f6d1814541a0bb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL Media Rights : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या 2023 ते 2027 या पाच वर्षांसठीचे मीडिया राईट्स (IPL Media Rights) 48,390 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलच्या प्रत्येक हंगामातील प्रत्येक सामन्यात फेकलेल्या एका चेंडूतून बीसीसीआयला 49 लाख रुपये इतका फायदा होणार आहे. तर एका षटकातून 2.95 कोटी आणि आयपीएल 2023 मधील प्रत्येक सामन्यातून 118 कोटींचा फायदा होणार आहे.
2018 साली स्टार इंडियाने पाच वर्षांसाठी आयपीएलचे मीडिया राईट्स विकत घेतले होते. ज्यावेळी प्रत्येक स्थानिक सामन्याची सरासरी किंमत 60 कोटी रुपये होती. विशेष म्हणजे बीसीसीआयने 2018-22 च्या आधीच्या वर्षांमध्ये आयपीएलच्या एका सामन्यातून जवळपास 55 कोटी रुपये इतके पैसे कमवले होते. यंदा भारतातील टीव्ही मीडिया राईट्सच्या शर्यतीत डिजनी स्टारने (Disney Star) तर डिजीटल हक्कांसाठी वायकॉम 18 ने (Viacom18) बाजी मारली आहे. त्यामुळे टीव्हीवर आयपीएलचे सामने हे स्टार स्पोर्ट्सवरच दिसणार असून ऑनलाईन सामने मात्र वूट (Voot) वर पाहावे लागणार आहेत. याशिवाय पॅकेज सी ज्यामध्ये एका सीजनच्या 18 निवडक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असणार आहेत. ते वायकॉम 18 ने विकत घेतले आहे. याशिवाय परदेशात आयपीएल सामन्यांचे प्रसारण करण्यासाठीचे पॅकेज डी वायकॉम 18 आणि टाईम्स इंटरनेट यांनी मिळून विकत घेतले आहेत.
कुठलं पॅकेज कितीला?
आयपीएलच्या पुढील पाच हंगामासाठी म्हणजेच 2023 ते 2027 या कालावधीत आयपीएल प्रसारण हक्कांसाठीची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. भारतीय उपखंडासाठी टिव्ही आणि डिजिटल हक्क, तसंच प्लेऑफच्या निवडक सामन्यांसाठीचे हक्क आणि परदेशात आयपीएळ सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क अशा एकूण चार पॅकेज्सची विक्री यावेळी झाली. हा संपूर्ण व्यवहार 48 हजार 390 कोटींमध्ये झाला आहे. यावेळी टीव्हीसाठीचे हक्क डिजनी स्टारने आपल्याकडे कायम ठेवले यासाठी त्यांनी 23 हजार 575 कोटी रुपये मोजले. तर डिजीटल प्लॅटफॉर्मसाठीचे हक्क 20 हजार 500 कोटींना वायकॉम 18 कंपनीला विकले गेले आहेत. आयपीएलच्या 410 सामन्यांसाठी या हक्कांची विक्री झाल्याने एका सामन्यातून जवळपास 107 कोटींची कमाई बीसीसीआय करणार आहे. यामध्ये टीव्हीच्या माध्यमातून एका सामन्यांतून जवळपास 57 कोटी तर डिजीटल प्लॅटफॉर्मवर एका सामन्यातून 50 कोटींची कमाई बीसीसीआय करेल. याशिवाय पॅकेज सीमध्ये एका सीजनच्या 18 निवडक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असणार आहे. हे पॅकेज वायकॉम 18 ने 2 हजार 991 कोटींना विकत घेतले आहे. तर तर चौथं पॅकेज ज्यात भारतीय उपमहाद्वीपच्या बाहेरील टीव्ही आणि डिजीटल ब्रॉडकास्टचे राइट्स असतील. हे पॅकेज वायकॉम 18 आणि टाईम्स इंटरनेट यांनी मिळून 1 हजार 324 कोटींना विकत घेतले आहे.
हे देखील वाचा-
- IPL Media Rights : आयपीएलचे टीव्ही मीडिया राईट्स डिजनी स्टारकडे; तर डिजीटल हक्क वायकॉम 18 कडे, बीसीसीआयलाही बक्कळ फायदा
- IPL Media Rights Auction : बीसीसीआयची चांदीच-चांदी; 44 हजार कोटींच्या घरात विकले गेले मीडिया राईट्स, एका सामन्यातून 100 कोटींहून अधिकची होणार कमाई
- IND vs SA: कटक टी-20 सामन्यात हजारो प्रेक्षकांनी गायलं 'माँ तुझे सलाम!', पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)