एक्स्प्लोर

IPL Media Rights Auction : बीसीसीआयची चांदीच-चांदी; 44 हजार कोटींच्या घरात विकले गेले मीडिया राईट्स, एका सामन्यातून 100 कोटींहून अधिकची होणार कमाई

IPL Media Rights Auction 2022 : आयपीएल स्पर्धेच्या मीडिया आणि डिजीटल राइट्ससाठी बऱ्याच मोठ्या कंपन्यांनी बोली लावली असून तब्बल 44 हजार 75 कोटींना टीव्ही आणि डिजीटल राईट्सची विक्री झाली आहे.

IPL Media Rights: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL). भारतात तर कोट्यवधी क्रिकेटप्रेमी या लीगवर भरभरुन प्रेम करतात, त्यामुळे आयपीएल सामने पाहणाऱ्यांची संख्याही कोट्यवधींच्या घरात आहे. ज्यामुळे या महास्पर्धेचे सामने प्रसारीत करण्याचे हक्क कोणत्या कंपनीकडे जाणार यासाठीही लिलाव प्रक्रिया पार पडते. दरम्यान भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठीचे मीडिया राइट्ससाठी लिलाव प्रक्रिया (IPL Media Rights 2023-27  Auction) घेतली. ज्यातून तब्बल 44 हजार 75 कोटींना टीव्ही आणि डिजीटल राईट्सची विक्री झाली असून कोणत्या कंपनीने हा लिलाव जिंकला आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आयपीएलच्या पुढील पाच हंगामासाठी म्हणजेच 2023 ते 2027 या कालावधीत आयपीएल प्रसारण हक्कांसाठीची लिलाव प्रक्रिया आज पूर्ण झाली. भारतीय उपखंडासाठी टिव्ही आणि डिजिटल हक्क यावेळी विकण्यात आले आहेत. रिपोर्ट्सनुसार हा व्यवहार 44 हजार 75 कोटींमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी टीव्हीसाठीचे हक्क 23 हजार 575 कोटींना तर डिजीटल प्लॅटफॉर्मसाठीचे हक्क 20 हजार 500 कोटींना विकले गेले आहेत. आयपीएलच्या 410 सामन्यांसाठी या हक्कांची विक्रि झाल्याने एका सामन्यातून जवळपास 105 कोटींची कमाई बीसीसीआय करणार आहे.

इतर दोन पॅकेजसचं काय?

यावेळी चार वेगवेगळ्या पॅकेजससाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. ज्यामध्ये पहिलं पॅकेज ए हे भारतीय उपखंडासाठी IPL सामने टीव्हीवर प्रसारण करण्याच्या राइट्ससाठी होतं. जे 23 हजार 575 कोटींना विकलं गेलं. तर पॅकेज बी डिजीटल प्लॅटफॉर्मसाठीच्या हक्कासाठी असून 20 हजार 500 कोटींना हे पॅकेज विकलं गेलं. तर पॅकेज सीमध्ये एका सीजनच्या 18 निवडक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असणार आहे. यात सीजनचा पहिला सामना, वीकएंडदिवशी होणारे डबल हेडरमधील सायंकाळचे सामना, चार प्लेऑफचे सामने यासाठी बोली लावण्यात आली. हे पॅकेज 1813 कोटींना विकलं गेल्याची माहिती रिपोर्ट्सनुसार समोर आली आहे. तर चौथं पॅकेज ज्यात भारतीय उपमहाद्वीपच्या बाहेरील टीव्ही आणि डिजीटल ब्रॉडकास्टचे राइट्स असतील. याचा लिलाव मंगळवारी पार पडेल अशी माहिती समोर आली आहे.  

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Embed widget