KL Rahul : लखनौ सुपर जाएंटस केएल राहुलविरोधात मोठी पावलं उचलणार, आयपीएल सुरु असतानाच कॅप्टनपद काढून घेणार? अन्...
Lucknow Super Giants : लखनौ सुपर जाएंटस कॅप्टन केएल राहुल विरोधात मोठी कारवाई करु शकते. सलग दोन पराभव झाल्यानंतर आणि संघमालकांसोबत झालेल्या वादानंतर ही कारवाई होण्याची शक्यता आहे.
![KL Rahul : लखनौ सुपर जाएंटस केएल राहुलविरोधात मोठी पावलं उचलणार, आयपीएल सुरु असतानाच कॅप्टनपद काढून घेणार? अन्... lucknow super giants will be take action on kl rahul by take back captaincy and not retained in upcoming ipl KL Rahul : लखनौ सुपर जाएंटस केएल राहुलविरोधात मोठी पावलं उचलणार, आयपीएल सुरु असतानाच कॅप्टनपद काढून घेणार? अन्...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/10/7e190ff41fc3206ad18968344c23a9501715303686840989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: आयपीएलचं 17 (IPL 2024) वं पर्व आता अखेरच्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्लेऑफमध्ये कोणत्या संघांना संधी मिळणार, कोणते संघ बाहेर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्लेऑफ प्रवेशाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर लखनौ सुपर जाएंटसला (Lucknow Super Giants) सलग दोन पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं लखनौला 98 धावांनी पराभूत केलं होतं. सनरायजर्स हैदराबादनं लखनौला 10 विकेटनं पराभूत केलं होतं. सलग दोन पराभवानंतर संघमालक संजीव गोयंका (Sanjiv Goenka) हे केएल राहुलवर संतापलेले पाहायला मिळाले होते. या वादाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर आणि क्रिकेटवर्तुळात मोठी चर्चा झाली होती. काही रिपोर्टनुसार लखनौ सुपर जाएंटस आगामी काळात केएल राहुल (KL Rahul) विरोधात मोठी कारवाई करु शकते.
कॅप्टनपद सोडावं लागणार?
लखनौ सुपर जाएंटस आयपीएल 2024 सुरु असतानाच केएल राहुलला कॅप्टन पदावरुन हटवू शकते.स्पोर्टसकीडाच्या रिपोर्टनुसार आयपीएलच्या लीग स्टेजमध्ये लखनौच्या अजून दोन मॅच बाकी आहेत. त्या दोन मॅचेससाठी केएल राहुलकडून कॅप्टनपद काढून घेतलं जाऊ शकतं. याशिवाय आगामी आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये लखनौ केएल राहुलला रिटेन करणार नाही.टीम मॅनेजमेंट आणि संघमालक संजीव गोयंका यांच्या कोणत्यातरी गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यानं केएल राहुल विरोधात लखनौ पावलं उचलण्याची शक्यता आहे.
केएल राहुलनं आयपीएल 2022 मध्ये लखनौ सुपर जाएंटसचं कॅप्टनपद स्वीकारलं होतं.2022 आणि 2023 च्या प्लेऑफमध्ये देखील लखनौनं धडक दिली होती. लखनौच्या संघाला दोन्ही आयपीएलमध्ये एलिमिनेटर मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. 2023 च्या आयपीएलमध्ये केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यानं काही मॅचेसमध्ये कृणाल पांड्याकडे नेतृत्त्व देण्यात आलं होतं. सध्या लखनौ टॉप 6 मध्ये आहे. लखनौच्या प्लेऑफमधील प्रवेशाच्या आशा जिवंत आहेत. मात्र, फ्रँचायजीचा वेगळाच प्लॅन आहे.
लखनौसाठी पुढील दोन मॅच करो या मरो
लखनौ सुपर जाएंटसनं यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 12 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यांच्या नावावर 12 गुणांची नोंद आहे. नेट रनरेट कमी असल्यानं ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. लखनौला प्लेऑफमध्ये पोहोचायचं असल्यास त्यांना राहिलेल्या दोन मॅच मोठ्या फरकानं जिंकाव्या लागतील. याचसोबत प्लेऑफच्या शर्यतीमधील चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यापैकी कोणत्याही दोन संघांना 16 गुणांपर्यंत पोहोचता न आल्यास लखनौसाठी प्लेऑफमध्ये पोहोचणं सोपं ठरु शकतं.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)