एक्स्प्लोर
दिल्लीची दाणादाण, मुंबई इंडियन्सचा 14 धावांनी विजय
मुंबई : दिल्लीच्या कगिसो रबादा आणि ख्रिस मॉरिस यांनी सातव्या विकेटसाठी 91 धावांची झुंजार भागीदारी रचूनही, वानखेडे स्टेडियमवरच्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सनं 14 धावांनी विजय खेचून आणला.
या सामन्यात मुंबईनं खरं तर दिल्लीला विजयासाठी 143 धावांचंच माफक आव्हान दिलं होतं. पण मुंबईच्या प्रभावी आक्रमणासमोर दिल्लीची सहा बाद 24 अशी दाणादाण उडाली. त्या परिस्थितीत रबादा आणि मॉरिसनं सातव्या विकेटसाठी 73 चेंडूंत 91 धावांची भागीदारी रचून दिल्लीच्या विजयासाठी शर्थ केली. पण बुमरानं रबादाचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली.
रबादानं 39 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह 44 धावांची भागीदारी केली. ख्रिस मॉरिसनं 41 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद 52 धावांची खेळी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement