एक्स्प्लोर

IND vs NZ Final : टीम इंडियाने अखेर 12 वर्षांचा दुष्काळ संपवला! विजयी भारताला 20 कोटी मिळणार; ही रक्कम कोण देणार, ICC की पाकिस्तान?

Champions Trophy 2025 : हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर 12 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाला ही बक्षीस रक्कम कोण देणार? हे जाणून घेऊ.

India Wins Champions Trophy 2025 :  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy) जिंकल्यानंतर भारताने दुबईत तिरंगा फडकवला आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर 12 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करत 12 वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतीय संघाचे (IND Vs NZ) नाव कोरलंय. टीम इंडियाच्या विजयात रोहित शर्माने (Rohit Sharma सर्वाधिक 76 धावा केल्या. याशिवाय श्रेयस अय्यरने 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर केएल राहुलने 34 धावांची नाबाद खेळी खेळी खेळत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. यासह भारत जगातील सर्वाधिक वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा देश बनला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघावरही पैशांचा वर्षाव झाला. यात अंतिम सामना जिंकणाऱ्या भारतीय संघाला ICC कडून सुमारे 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. तर उपविजेत्या न्यूझीलंडला 1.12 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 9.72 कोटी रुपये मिळतील. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानने केले होते. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाला ही बक्षीस रक्कम कोण देणार? 

यजमान देश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बक्षीस रक्कम देतो का?

पुढे आलेल्या माहितीनुसार, ICC T20 विश्वचषक 2021 दरम्यान पाकिस्तान ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे आयोजन करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 1996 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, सुरुवातीपासूनच पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पडला. आयसीसीच्या नियमांनुसार, ज्या देशाला स्पर्धेची जबाबदारी दिली जाते, तो तेथे होणाऱ्या सामन्यांचा संपूर्ण खर्च उचलतो. याशिवाय यजमान देश खेळाडूंच्या सुरक्षेची, त्यांच्यासाठी वाहतूक आणि निवासाची व्यवस्था करतो. जोपर्यंत बक्षीस रकमेचा संबंध आहे, ती यजमान देशाची जबाबदारी नाही.

अंतिम फेरीत विजयी होणाऱ्या सामन्याला ICC बक्षीस रक्कम देईल

कोणत्याही स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम आयसीसीकडून जाहीर केली जाते. स्पर्धेच्या सुरुवातीला आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण 6.9 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 59 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होती. हे 2017 मध्ये झालेल्या सामन्यापेक्षा 53 टक्के अधिक आहे. यामध्ये भारतीय संघाला सुमारे 20 कोटी रुपये, तर उपविजेत्या न्यूझीलंडला 9.72 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना 4.85 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. ही बक्षीस रक्कम आयसीसीकडून विजेत्या संघाला दिली जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget