एक्स्प्लोर
टीम इंडियाची पहिली डे-नाइट कसोटी वेस्टइंडिजविरुद्ध : सूत्र
बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये वेस्टइंडिज विरुद्ध आपली पहिली डे-नाइट कसोटी खेळणार आहे.
मुंबई : टीम इंडिया लवकरच डे-नाइट कसोटी खेळण्याची शक्यता आहे. 2018मध्येच भारतीय संघ पहिली डे-नाइट कसोटी खेळू शकतं.
बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये वेस्टइंडिज विरुद्ध आपली पहिली डे-नाइट कसोटी खेळणार आहे. या कसोटीसाठी बीसीसीआयने हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची निवड केली आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे.
असं असलं तरी याबाबात कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलेली नाही. बीसीसीआयने आतापर्यंत कसोटीतील या बदलांना विरोधच केला आहे.
याआधी भारतच्या दोन-तीन होम सीरीजमध्ये डे-नाइट कसोटीबाबत चर्चा झाली होती. मात्र, त्यावेळी बीसीसीआयने ते मान्य केलं नव्हतं. डे-नाइट कसोटीच्या सरावासाठी बीसीसीआयने दुलीप करंडकाच्या फॉर्मेटमध्ये बदल केला होता. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप तरी बीसीसीआयने फार काही बदल केले नाही.
टीम इंडियाला भारतात यावर्षी तीनच कसोटी सामने खेळायचे आहेत. ज्यातील पहिली कसोटी अफगाणिस्तानसोबत जूनमध्ये असणार आहे. त्यानंतर वेस्टइंडिजचा संघ ऑक्टोबरमध्ये भारताचा दौरा करणार आहे. यावेळी भारताला दोन कसोटी सामने खेळावे लागणार आहेत. त्याच वेळी डे-नाइट कसोटी खेळवण्यात येईल अशी सध्या चर्चा सुरु आहे.
आतापर्यंत 10 डे-नाइट कसोटी खेळवण्यात आले आहेत. भारत आणि बांगलादेश वगळता सर्व देशांनी डे-नाइट कसोटी खेळल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement