एक्स्प्लोर
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया सज्ज
तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं वानखेडे स्टेडियमर विजयी सलामी दिली आहे. त्यामुळं मालिकेतलं आव्हान राखायचं तर, टीम इंडियाला दुसरा वन डे सामना जिंकावाच लागेल.
पुणे : भारत आणि न्यूझीलंड संघांमधला दुसरा वन डे सामना आज पुण्यातील गहुंजेच्या एमसीए स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.
तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं वानखेडे स्टेडियमवर विजयी सलामी दिली. त्यामुळं मालिकेतलं आव्हान राखायचं तर, टीम इंडियाला दुसरा वन डे सामना जिंकावाच लागेल. न्यूझीलंडविरुद्धची वन डेची दुसरी लढाई टीम इंडिया इतकीच केदार जाधवसाठीही प्रतिष्ठेची ठरणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या भारतीय संघातून त्याला वगळण्यात आलं आहे. आता भारताच्या वन डे संघातलं स्थान राखण्यासाठी केदारला आपली कामगिरी उंचवावी लागेल.
भारत-न्यूझीलंड संघांमधला दुसरा वन डे सामना हा गहुंजेत, म्हणजे केदारच्या घरच्या मैदानात होत आहे, ही त्याच्या दृष्टीनं जमेची बाजू ठरावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement