एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंडिया वि. इंग्लंड: इंग्लंडची पहिल्या दिवसअखेर आठ बाद 268 धावांची मजल
मोहाली (पंजाब) : भारतीय गोलंदाज आणि इंग्लिश फलंदाजांमध्ये मोहाली कसोटीच्या पहिल्या दिवशी चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला. उमेश यादव, जयंत यादव आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. पण जॉनी बेयरस्टोनं मधल्या फळीच्या फलंदाजांना हाताशी धरून मोहाली कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडला आठ बाद 268 अशी समाधानकारक स्थितीत मजल मारून दिली.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी आदिल रशीद चार धावांवर, तर गॅरेथ बॅटी शून्यावर खेळत होता. या कसोटीत इंग्लंडनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. भारतीय गोलंदाजांनी हसीब हमीद, ज्यो रूट, अॅलेस्टर कूक आणि मोईन अली यांना स्वस्तात माघारी धाडून उपाहाराला इंग्लंडची चार बाद 92 अशी केविलवाणी अवस्था केली होती.
जॉनी बेयरस्टोनं बेन स्टोक्स, जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांना हाताशी धरून इंग्लडचा डाव आठ बाद 268 असा सावरला.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड संघांमधली राजकोट कसोटी अनिर्णीत राहिली, पण विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाने 246 धावांनी मिळवलेल्या विजयाने कोहली आणि त्याच्या शिलेदारांचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे मोहालीतही फिरकी आक्रमणाचा वापर करून, विजयपताका फडकावण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.
साहाऐवजी पार्थिव पटेल
यष्टिरक्षक रिद्धिमान साहाला झालेल्या दुखापतीमुळं भारताला विशाखापट्टणम कसोटीतला विजयी संघ मोहाली कसोटीत खेळवता येणार नाही. साहाऐवजी अनुभवी पार्थिव पटेलला या कसोटीत खेळण्याची संधी देण्यात आली आहे.
पार्थिवचं मोहालीत 8 वर्षांनी कसोटीत पुनरागमन
गुजरातचा हा अनुभवी यष्टिरक्षक मोहालीत तब्बल आठ वर्षांनी कसोटीत पुनरागमन करेल. भारतीय संघाच्या 2008 सालच्या श्रीलंका दौऱ्यातल्या कोलंबो कसोटीत खेळल्यानंतर पार्थिव कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. पार्थिवनं 2002 सालच्या इंग्लंड दौऱ्यातल्या नॉटिंगहॅमच्या दुसऱ्या कसोटीत पदार्पण केलं होतं. पुढच्या सव्वा दोन वर्षांच्या कालावधीत त्यानं 19 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. पण त्यानंतर 2008 सालच्या श्रीलंका दौऱ्यात तो एकमेव कसोटीत खेळला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement