एक्स्प्लोर
LIVE: भारत वि. बांगलादेश कसोटी- सलामीवीर मुरली विजयचं शानदार शतक
हैदराबाद: विराट कोहलीची टीम इंडिया आणि मुशफिकर रहिमचा बांगलादेश संघ यांच्यामधल्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अवघ्या दोन धावा करुन सलमीवीर केएल राहुल बाद झाला. पण त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारानं टीम इंडियाचा डाव सावरत अर्धशतकं झळकावली.
- सलामीवीर मुरली विजयचं दणदणीत शतक, विजयचं बांगलादेशविरुद्ध दुसरं तर कारकिर्दीतील नववं शत
- भारताला दुसरा धक्का, चेतेश्वर पुजारा 83 धावांवर बाद,
सध्या मुरली विजय 64 धावांवर खेळत आहे. तर चेतेश्वर पुजारा 55 धावांवर फलंदाजी करत आहे. यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारतानं 127 धावांपर्यंत मजला मारली आहे.
दरम्यान, बांगलादेशच्या दृष्टीनं ही कसोटी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण बांगलादेशचा भारतीय भूमीवरचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया 'नंबर वन'वर आहे, तर बांगलादेश चक्क नवव्या स्थानावर आहे. त्यामुळं उभय संघांमधल्या या सामन्याकडे असमान ताकदीच्या फौजांमधली लढाई म्हणून पाहिलं जात आहे.
बांगलादेशनं वन डे क्रिकेटमध्ये धक्कादायक निकाल देणारा संघ अशी ख्याती मिळवली असली, तरी कसोटी क्रिकेटमध्ये मात्र सोळा वर्षांनंतरही बांगलादेशच्या क्षमतेविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या मोसमात न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांविरुद्ध बांगलादेशला चारपैकी तीन कसोटी सामने गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळं हैदराबादच्या कसोटी सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement