सचिन तेंडुलकरने बोल्ड झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन बॉलरला दिलेलं चॅलेंज तंतोतंत खरं ठरलं
5 ऑक्टोबर 2007 ला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये एकदिवसीय मालिकेच्या तिसर्या सामन्यादरम्यान हा प्रकार घडला.
नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात सचिन तेंडुलकरच्या शेकडो कथा असल्या तरी काही गोष्टी मोठ्या रंजक आहेत. सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत त्याच्या चाहत्यांना आणि ज्या खेळाडूंसोबत किंवा त्यांच्याविरुद्ध अनेक वेळा खेळला आहे त्यांना ऑटोग्राफ्स दिले आहेत. 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रॅड हॉगला त्याने असाच एक ऑटोग्राफ दिला होता.
5 ऑक्टोबर 2007 रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वनडे मालिकेच्या तिसर्या सामन्यादरम्यान भारताला विजयासाठी 291 धावांचे लक्ष्य होते. सचिन त्या सामन्यात गौतम गंभीरबरोबर डाव सुरू करण्यासाठी आला होता. हॉगने 27 व्या षटकात सचिनला बोल्ड केलं होतं. युवराज सिंगचे शतक असूनही त्या सामन्यात भारताला 47 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
भारतीय संघाचा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौरा; वेळापत्रक जाहीर
हॉगने द संडे एजला सांगितले की सामन्यानंतर सचिनकडे त्याच फोटोवर ऑटोग्राफ घेण्यासाठी गेलो. सचिनने अगदी साधेपणाने ऑटोग्राफ दिले. मात्र, त्याच फोटोवर सचिनने असेही लिहलं होतं, की तो पुढच्या वेळी त्याला बाद करु शकणार नाही. "त्या सामन्यात मी त्याला बाद केले आणि नंतर सचिनची सही घ्यायला गेलो. त्यांनी मला ऑटोग्राफ दिले व माझ्यासाठी एक संदेशही लिहिला, हे पुन्हा कधीही होणाप नाही हॉग"
ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणतो.. हा गोलंदाज भारताविरुद्ध कहर करणार
सचिनने सांगितलेली गोष्ट तंतोतंत खरी ठरली. कारण, त्यानंतर हॉग पुन्हा सचिनला बाद करू शकला नाही. पण, तो ऑटोग्राफ ही एक अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे. हॉग म्हणाला, "ही घटना मौल्यवान आहे. सचिन तेंडुलकरसारख्या खेळाडूबरोबर मैदानावर खेळणे हा माझा सन्मान आहे. त्याला गोलंदाजी करणे हा एक चांगला अनुभव आहे. जर मी तिथे असलो तर मी त्याच्याशी स्पर्धा करेन.