एक्स्प्लोर
INDvsSL: धवनची धडाकेबाज खेळी, द्विशतक अवघ्या 10 धावांनी हुकलं
गॉल कसोटीत श्रीलंकेविरुद्ध धडाकेबाज खेळी करणाऱ्या शिखर धवनचं द्विशतक अवघ्या 10 धावांनी हुकलं आहे.

गॉल (श्रीलंका): श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत भारताचा सलामीवीर शिखर धवनचं द्विशतक अवघ्या 10 धावांनी हुकलं. 168 चेंडूत 190 धावांची धडाकेबाज खेळी केली. ज्यात तब्बल 31 चौकारांचा समावेश आहे. - INDvsSL : गॉल कसोटीत चेतेश्वर पुजाराचं शानदार शतक, 173 चेंडूत 100 धावा नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण अभिनव मुकुंद अवघ्या 12 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारानं धवनला चांगली साथ दिली. पुजारा सध्या 75 धावांवर खेळत आहे. पुजारा आणि धवन यांच्या 266 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 282 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्याची नामी संधी भारताकडे आहे. गेल्या दोन वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं कामगिरी खूपच चांगली झाली आहे. 2015 सालच्या गॉल कसोटीपासून आजच्या गॉल कसोटीआधी भारतानं सतरापैकी बारा कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























