एक्स्प्लोर
IND vs SA 3rd Test : शतकवीर रोहित शर्माची चार विक्रमांना गवसणी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान रांची येथे तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने तीन बाद 224 धावांची मजल मारली आहे.
रांची : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान रांची येथे तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने तीन बाद 224 धावांची मजल मारली आहे. या कसोटीत पावसाच्या व्यत्ययामुळं पहिल्या दिवशी 58 षटकांचाच खेळ होऊ शकला. त्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताची तीन बाद 39 अशी घसरगुंडी उडवली होती. परंतु सलामीवीर रोहित शर्मा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या मुंबईकरांनी तिसऱ्या विकेटसाठी 185 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताचा डाव सावरला.
रोहित शर्माने 164 चेंडूंत 14 चौकार आणि 4 षटकार ठोकून 117, तर अजिंक्य रहाणेने 135 चेंडूंत 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 83 धावांची खेळी केली. आजच्या सामन्यात रोहित आणि अजिंक्यने आफ्रिकन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. चौफेर फटकेबाजी करणाऱ्या रोहितने आजच्या सामन्यात चार नव्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
हिटमॅनचे चार नवे विक्रम
1. आजच्या शतकी खेळीत रोहितने चार षटकार ठोकले. या षटकारांसह एका कसोटी मालिकेत सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम रोहितने स्वतःच्या नावावर केला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत रोहितने आतापर्यंत 17 षटकार ठोकले आहेत. एका मालिकेत सर्वाधिक षटकार ठोखण्याचा विक्रम यापूर्वी वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमायरच्या नावावर होता. 2018 मध्ये हेटमायरने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 15 षटकार ठोकले होते.
2. आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत रोहितने सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादीतदेखील पहिलं स्थान पटकावलं आहे. त्याने इंग्लंडच्या बेन स्टोक्सला ( 13) मागे टाकले आहे. रोहितनने तीन कसोटी सामन्यांच्या 4 डावांत 17 षटकार ठोकले आहेत. स्टोक्सने 10 डावांत 13 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर भारताच्या मयांक अग्रवाल ( 8) आणि रवींद्र जडेजा ( 7) यांचा नंबर लागतो.
3. आजच्या शतकी खेळीसह एका कसोटी मालिकेत तीन शतकं झळकावणारा रोहित भारताचा हा दुसरा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांनी सलामीवीर म्हणून तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. (तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकाच मालिकेत तीन शतके झळकावण्याची कामगिरी केली आहे.) दरम्यान, हिटमॅन रोहितने आज त्याच्या कसोटी क्रिकेटमधल्या दोन हजार धावांचा टप्पादेखील पार केला आहे.
4. रोहितने 2019 या कॅलेंडर वर्षातील नववं शतक ठोकलं आहे. या कामगिरीसह हिटमॅनने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने 1998 या कॅलेंडर वर्षात नऊ शतकं झळकावली होती. सचिनसह दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने 2005 या कॅलेंडर वर्षात असा विक्रम केला होता. तर ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने 2016 या कॅलेंडर वर्षात नऊ आंतरराष्ट्रीय शतकं ठोकण्याचा विक्रम केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement