एक्स्प्लोर
श्रीलंकेची चेंडूशी छेडछाड, शनाकाला आयसीसीचा दणका
आयसीसीने प्रकरणाची गंभीर दखल घेत शनाकाला समज दिली आणि या गोष्टीची पुन्हा काळजी घेण्याची सूचनाही केली.
नागपूर : भारताच्या दुसऱ्या डावात विकेट घेण्यात अपयशी ठरलेला श्रीलंकेचा संघ अडचणीत आला आहे. चेंडूशी छेडछाड केल्यामुळे श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज दसुन शनाकाला सामन्याच्या मानधनापैकी 75 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे.
आयसीसीने ही कारवाई केली. नागपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शनाका चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. शनाकाने आयसीसीचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांच्यासमोर ही चूक मान्यही केली. आयसीसीने प्रकरणाची गंभीर दखल घेत शनाकाला समज दिली आणि या गोष्टीची पुन्हा काळजी घेण्याची सूचनाही केली.
सलामीचा मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकांनी टीम इंडियाने नागपूर कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 2 बाद 312 धावांची मजल मारत श्रीलंकेवर 107 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.
मुरली विजयने कसोटी कारकीर्दीतलं दहावं शतक साजरं केलं. त्याने 221 चेंडूंत 128 धावांची खेळी केली. यात त्याने 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्याचबरोबर पुजारानही 284 चेंडूंत तेरा चौकारांसह नाबाद 121 धावांची खेळी उभारली.
पुजाराचं कारकीर्दीतलं हे 14 वं कसोटी शतक ठरलं. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 209 धावांची महत्वपूर्ण भागिदारी रचली. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीनेही नाबाद अर्धशतक झळकावताना टीम इंडियाला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा पुजारा 121 तर कर्णधार कोहली 54 धावांवर खेळत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
नागपूर
व्यापार-उद्योग
Advertisement