(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mohammed Siraj : सिराजकडून फक्त 7 चेंडूत 3 विकेट घेत लंकादहन; श्रीलंकेविरुद्ध आशिया कपनंतर वर्ल्डकपमध्येही 'मियाँ मॅजिक'
India vs Sri Lanka : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज मियाँ मॅजिक मोहम्मद सिराजचे वादळ आलं आहे. या वादळात श्रीलंकेचे फलंदाज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले.
मुंबई : जसप्रित बुमराहने पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर पथुम निसंकाला बाद केल्यानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज मियाँ मॅजिक मोहम्मद सिराजचे वादळ आलं आहे. या वादळात श्रीलंकेचे फलंदाज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. डावाच्या दुसऱ्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर सिराजने दिमूथ करुणरत्नेला बाद करत पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर सादीराला सुद्धा त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर बाद करत त्याने दुसरा धक्का दिला. त्यानंतर कुशल मेंडिस सुद्धा एक धाव काढून सिराजचा तिसरा बळी ठरला. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला तिसरा झटका बसला. मोहम्मद सिराजने सदिरा समरविक्रमाला बाद केले. सदीरा समरविक्रमा एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रीलंकेचे तीनही फलंदाज शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था 3-4 अशी झाली.
MOHAMMED SIRAJ DESTROYING SRI LANKA....!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2023
3rd wicket in just 7 balls, he's on fire!!! pic.twitter.com/5f6ezTkNPG
दरम्यान, भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 50 षटकात 8 विकेट गमावत 357 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. विराट कोहलीने 94 चेंडूत 88 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार मारले. याशिवाय शुभमन गिलने 92 चेंडूत 92 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले.
MOHAMMED SIRAJ GETS 2 IN THE OVER...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2023
Siraj on fire at Wankhede! pic.twitter.com/UUMiTc8rik
श्रेयस अय्यरने शेवटच्या षटकांमध्ये शानदार फलंदाजी केली. श्रेयस अय्यरने 56 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकार मारले. मात्र, श्रेयस अय्यरचे फॉर्ममध्ये परतणे ही भारतीय संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्याचवेळी रवींद्र जडेजा 24 चेंडूत 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय अष्टपैलू खेळाडूने आपल्या खेळीत 1 चौकार आणि 1 षटकार लगावला.
विराट कोहली आणि शुभमन गिलच्या विकेट लवकर पडल्या
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल 19 चेंडूत 21 धावा करून बाहेर पडला. त्याचवेळी सूर्यकुमार यादवही लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्यकुमार यादवने घरच्या मैदानावर 9 चेंडूत 12 धावा केल्या. तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय कर्णधार पहिल्याच षटकात एकही धाव न देता पॅव्हेलियनमध्ये परतला.
Jasprit Bumrah picked up a wicket on his first ball.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2023
Mohammed Siraj picked up a wicket on his first ball. pic.twitter.com/voQRI5bCSl
विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यात मोठी भागीदारी...
दिलशान मधुशंकाने रोहित शर्माला आपला शिकार बनवले. मात्र यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी शानदार भागीदारी केली. विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यात १८९ धावांची भागीदारी झाली. शुभमन गिलला बाद करून दिलशान मधुशंकाने ही भागीदारी तोडली. यानंतर विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला.
इतर महत्वाच्या बातम्या