(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virak Kohli : विराटचा बर्थडे अन् शतकाच्या सेलिब्रेशनसाठी इडन गार्डनवर 'खतरनाक तयारी'! 'मै भी कोहली, तु भी कोहली'
मास्क देण्यापूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून वाढदिवसानिमित्त केक कट केला जाईल. त्याचबरोबर स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित सुद्धा केलं जाणार आहे. या स्पर्धेमध्ये विराट कोहली अत्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
कोलकाता : वर्ल्डकप स्पर्धेमध्ये (ICC Cricket World Cup 2023) सर्वात खतरनाक लयीत असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (india vs south africa) उद्या रविवारी सिटी ऑफ जाॅय कोलकातामधील इडन गार्डनवर महामुकाबला होणार आहे. या महामुकाबल्यासाठ कोलकातामधील ईडन गार्डन मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
The 🐐 will play on his birthday tomorrow at the Eden Gardens. pic.twitter.com/UrGapU9XZM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023
या मैदानावर टीम इंडियासाठी विजय जितका महत्त्वाचा असेल तितकाच विराट कोहलीचा वाढदिवस आणि त्याच्या दीर्घ प्रतीक्षेतील 49 वं शतक सुद्धा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून विराट कोहलीच्या बर्थडेसाठी आणि त्याच्या शतकासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनेच त्याचा वाढदिवस साजरा व्हावा यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशन मोठ्या तयारीला लागला आहे.
King Kohli's edit by Star Sports. 🐐
— Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2023
- The face of world cricket. pic.twitter.com/sNOM4iG4Uy
मैदानावर जवळपास 70000 दर्शक विराट कोहलीचे मुखवटे घालून असणार आहे त्यामुळे एक प्रकारे फक्त आणि फक्त कोहलीमय इडन गार्डन होईल, यात शंका नाही. विराट कोहली चा 35 वा जन्मदिवस यादगार होण्यासाठी मुखवटे मोफत दिले जाणार आहेत. त्याचबरोबर या सामन्यासाठी सर्व तिकिटे यापूर्वीच विकली गेली आहेत. त्यामुळे लाखावर या स्टेडियमवरती प्रेक्षकांची संख्या असेल यामध्ये शंका नाही.
Virat Kohli has the highest average against South Africa in ODI history - 61. [min 20 innings]
— Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2023
- The 🐐 of ODIs. pic.twitter.com/tcNW2F2djr
मास्क देण्यापूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून वाढदिवसानिमित्त केक कट केला जाईल. त्याचबरोबर त्याला स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित सुद्धा केलं जाणार आहे. या स्पर्धेमध्ये विराट कोहली अत्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. स्पर्धेमध्ये त्याची तब्बल तीन शतके हुकली आहेत. अन्यथा त्याचे शतकांचे अर्धशतक या विश्वकपमध्येच पूर्ण झाले असते.
Eden Gardens likely to be a batting belter for India vs South Africa match. [PTI] pic.twitter.com/w83opwbFvl
— Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2023
जर उद्याच्या सामन्यामध्ये विराट कोहली शतक झळकवू शकला तर त्याची क्रिकेटच्या देवाची बरोबरीही असेल. त्यामुळे या या क्षणाला यादगार करण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. त्यामुळे एकंदरीतच उद्याच्या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या