Afghanistan Captain Hashmatullah Shahidi : माझी आई तीन महिन्यांपूर्वी गेली, देशात निर्वासितांचा जगण्याशी संघर्ष, हा विजय त्यांनाच समर्पित; अफगाण कॅप्टनला भावना अनावर
Afghanistan Captain Hashmatullah Shahidi : स्पर्धेतील चौथा आणि सलग तिसऱ्या विजयाची नोंद केल्यानंतर अफगाणिस्तानचा कॅप्टन हशमतुल्लाह शाहीदी अत्यंत भावूक झाला.
Afghanistan Captain Hashmatullah Shahidi : एकदिवसीय विश्वचषक आतापर्यंत अफगाणिस्तानचा प्रवास ऐतिहासिक ठरला आहे. आज लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर नेदरलँड्सचा 7 गडी राखून पराभव करून संघाने स्पर्धेतील चौथा विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने पाँईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचल्याने सेमीफायनलासाठी सुद्धा दावेदारी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानपेक्षा अफगाणिस्तानची कामगिरी सरस झाली आहे. 4 विजयानंतर अफगाण संघाचे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीचे 8 गुण आहेत. तर गतविजेता इंग्लंड दहाव्या क्रमांकावर कायम आहे.
Afghanistan captain said, "there are a lot of refugee people struggling in Afghanistan, we all are watching their videos and we feel their pain. I dedicate this win to them". pic.twitter.com/p2yKF5trV1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2023
अफगाण कॅप्टनला भावना अनावर
स्पर्धेतील चौथा आणि सलग तिसऱ्या विजयाची नोंद केल्यानंतर अफगाणिस्तानचा कॅप्टन हशमतुल्लाह शाहीदी अत्यंत भावूक झाला. तो म्हणाला की, माझ्या आईचं तीन महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यामुळे माझं दु:खामध्ये आहे, अनंत वेदनांमधून आम्ही गेलो. त्यामुळे संघाची अभूतपूर्व कामगिरी ही माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी आहे. तो पुढे म्हणाला की, देशातील लाखो निर्वासितांचा संघर्ष सुरु आहे. आम्ही सर्व त्यांचे व्हिडिओ पाहत असून त्यांच्यासाठी वेदना होत आहेत, त्यांचं दु:ख आम्ही समजू शकतो. मी हा विजय त्यांना समर्पित करत आहे.
Afghanistan Captain said "I lost my mother 3 months back, my family is in lots of pain so this is a huge achievement for me & my country". pic.twitter.com/JgdOClEZy6
— Johns. (@CricCrazyJohns) November 3, 2023
अफगाणिस्तान सेमीफायनलचा दावेदार
अफगाणिस्तानने स्पर्धेत 7 सामने खेळले आहेत, ज्यात संघाने 4 जिंकले आहेत. अफगाणिस्तानच्या खाली सहाव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानने सातपैकी तीन सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत अफगाण संघ पुढील सामना जिंकून उपांत्य फेरीचा प्रबळ दावेदार बनू शकतो आणि पाकिस्तानचे कार्ड पूर्णपणे कापले जाऊ शकते.
Afghanistan miss-calculated the run chase in Asia Cup and knocked out of the tournament then came into the World Cup:
— Johns. (@CricCrazyJohns) November 3, 2023
- Chase down 283 vs PAK.
- Chase down 242 vs SL.
- Chase down 180 vs NED.
They are writing a history in Afghanistan cricket. pic.twitter.com/YpBWMZDakB
इतर महत्वाच्या बातम्या