एक्स्प्लोर
Advertisement
2019 च्या वर्ल्डकपचा विजेता ठरवणारा वादग्रस्त नियम आयसीसीने बदलला
सेमी फायनल किंवा फाय़नलमध्ये सुपर ओव्हरही अनिर्णित झाली तर निकाल लागेपर्यंत पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल असा निर्णय घेत आयसीसीने नियमात बदल केला आहे.
नवी दिल्ली : 2019 च्या विश्वचषकाच्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याच्या निकालावर झालेल्या टीकेनंतर अखेर आयसीसीने सुपर ओव्हरच्या नियमांत बदल केला आहे. सोमवारी आयसीसीने यासंदर्भात पत्रक जाहीर करत माहिती दिली आहे. सुपवर ओव्हच्या नियमानुसार अधिक चौकारांच्या जोरावर आयसीसीने इंग्लंडला घोषित केलं. यानंतर आयसीसीच्या या नियमांवर अनेक आजी-माजी खेळाडूंनी टीका केली होती.
ICC World Cup 2019 : विजयानंतर बेन स्टोक्सने न्यूझीलंडची माफी मागितली!
सुपर ओव्हरचा नवीन नियम काय ?
सेमी फायनल किंवा फाय़नलमध्ये सुपर ओव्हरही अनिर्णित झाली तर निकाल लागेपर्यंत पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल असा निर्णय घेत आयसीसीने नियमात बदल केला आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवल्या जातील असा निर्णय आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आला.
ICC Cricket World Cup 2019 | विश्वचषकाच्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर अन्याय? | विश्वचषक माझा | ABP Majha
World Cup 2019 | क्रिकेटचा जन्मदाता देश पहिल्यांदाच विश्वविजेता, रोमहर्षक सामन्यात इंग्लंड विजयी
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात काय झाले होते?
न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना, इंग्लंडने 50 षटकात 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. यानंतर सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जोस बटलरने 15 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर 16 धावांचं लक्ष्य होतं. पण न्यूझीलंडला 15 धावाच करता आल्या आणि सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. मात्र ‘सुपीरिअर बाऊंड्री काऊंट’ अर्थात सामन्याती सर्वाधिक चौकाराच्या आधारावर इंग्लंडने सामना जिंकत, विजेतेपदावर नाव कोरलं. इंग्लंडने या सामन्यात 24 तर न्यूझीलंडने 16 चौकार लगावले होते.
संबंधित बातम्या
सुपर ओव्हर आणि सुपर टायब्रेकरवरुन विम्बल्डन-आयसीसीमध्ये मजेशीर संवाद
World Cup 2019 | क्रिकेटचा जन्मदाता देश पहिल्यांदाच विश्वविजेता, रोमहर्षक सामन्यात इंग्लंड विजयी
ICC World Cup 2019 : विजयानंतर बेन स्टोक्सने न्यूझीलंडची माफी मागितली!
World Cup 2019 | इंग्लंडला ओव्हरथ्रोवर सहा धावा देण्याचा निर्णय चुकीचा : सायमन टॉफेल
World Cup 2019 | इंग्लंडच्या विजयानंतर आयसीसीच्या बाऊंड्री काऊंट नियमावर खेळाडूंची नाराजी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement